Deool Band 2: 10 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'देऊळ बंद' (Deool Band 2) या चित्रपटाने महाराष्ट्रातील लाखो स्वामी भक्तांची मन जिंकली. चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड चालला. आता तब्बल 11 वर्षांनी लेखक व दिग्दर्शक प्रवीण तरडे देऊळ बंद 2 चित्रपट घेऊन आले आहेत. हा चित्रपट 21 मे रोजी महाराष्ट्र भरत रिलीज होणार आहे. या भागात महिला शेतकऱ्यानं थेट स्वामींना चॅलेंज केलं आहे. या चित्रपटात मोहन जोशींनी स्वामी समर्थांची भूमिका साकारली आहे. सगळ्या भूमिकांची चर्चा रंगलेली असताना आता पहिल्या भागातील 'राघव शास्त्री ' ची भूमिका करणारा अभिनेता गश्मीर महाजनीही ' देऊळ बंद 2 ' मध्ये पाहायला मिळणार आहे. (Gashmir Mahajani) या संदर्भातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी (Mohan Joshi) आणि गश्मीर महाजनी एकमेकांशी भेट घेताना दिसतात. 

मोहन जोशी आले गश्मीर महाजनीला भेटायला..

देऊळ बंद चित्रपटाला रिलीज होण्यासाठी अवघे 24 तास राहिले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर सध्या एक रील वायरल होतेय. यात अभिनेते मोहन जोशी ' राघव शास्त्री ' ची भूमिका साकारणाऱ्या गश्मीर महाजनीला भेटायला गेले. मोहन जोशींना पाहताच गश्मीर म्हणतो ' काय मग, कशाला बोलवलय मला आज? त्यावर मोहन जोशी म्हणतात ' अरे जो भेटतोय तुम्हाला विचारतोय की राघव शास्त्री देऊळ बंद 2 मध्ये दिसणार आहेत का नाही. ' अरे मला धमकी दिल्यासारखं विचारत आहेत. तू आहेस ना देऊळ बंद 2 मध्ये नक्की ? यावर गश्मीर म्हणतो ' तुमची इच्छा काय आहे ? मी येऊ की नाही ? 'तू यावं अशीच माझी इच्छा आहे.आणि केवळ माझीच नाही तर हजारो लोकांची हीच इच्छा आहे . त्यावर गश्मीर म्हणतो ' स्वामींची इच्छा आहे म्हटलं तर मला यावच लागणार ना आता. ' जशी स्वामींची इच्छा ' असं म्हणत त्याने मोहन जोशींचे समोर हात टेकले ..आता परीक्षा दिल्याशिवाय मी राहणार नाही ..आता परीक्षा देवाची. असं ते म्हणताना दिसतात. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

दिग्दर्शक प्रवीण तरडे (Director Pravin Tarde) यांच्या या चित्रपटात यावेळी एका शेतकरी महिलेची संघर्षमय कथा पाहायला मिळणार आहे. दुष्काळ, शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर थेट देवाला जाब विचारणारी ही महिला कथानकाच्या केंद्रस्थानी आहे. अभिनेत्री स्नेहल तरडे ही भूमिका साकारत असून, मोहन जोशी श्री स्वामी समर्थांच्या भूमिकेत झळकणार आहेत.