Deool Band 2 Box Office Collection: मराठी सिनेमा (Marathi Cinema) 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) या सिनेमाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घातला. या सिनेमाची अल्पावधीतच लोकप्रियता (Entertainment) वाढत गेली. प्रवीण तरडे दिग्दर्शित भक्तीपर या सिनेमाचा बॉक्स ऑफिसवरील प्रवास अखेर संपला आहे. मोहन जोशी आणि स्नेहल तरडे  अभिनीत या सिनेमाने संपूर्ण एक महिना बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली.  'देऊळ बंद 2'या सिनेमाचे फायनल बॉक्स ऑफिस कलेक्शन किती होते? आतापर्यंतचे कलेक्शन किती?  जाणून घेऊयात.

Continues below advertisement

10 कोटी बजेटमध्ये तयार झालेल्या 'देऊळ बंद 2' सिनेमाने किती कोटी कमावले? (Deeol Band 2 Box Office Collection)

प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमात मोहन जोशी,  स्नेहल तरडे,  महेश मांजरेकर, मंगेश देसाई तसेच इतर कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'देऊळ बंद 2' हा सिनेमा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा तिसरा मराठी चित्रपट ठरला आहे. पिंकव्हिलाच्या रिपोर्ट्सनुसार,  भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचे क्लोजिंग कलेक्शन 85 कोटी इतकी झाले आहे, अशी माहिती समोर आली आहे. 

'देऊळ बंद 2'  हा सिनेमा 'सैराट' आणि  'बाईपण भारी देवा' या सिनेमाचे कलेक्शन मोडू शकले नाही. कारण या दोन्ही सिनेमांनी साधारण 90 कोटीपर्यंतचा आकडा गाठला होता.  जर एकूणच पाहायला गेलं तर, कमाईच्या बाबतीत हा मराठी सिनेमा मराठी सिनेसृष्टीतील आकडेवारीत चौथ्या स्थानावर आहे. 'राजा शिवाजी' या सिनेमाने मराठीसह हिंदी व्हर्जनमधून  110 कोटींचे कलेक्शन केले आहे. 

Continues below advertisement

'देऊळ बंद 2' हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीत ब्लॉकबस्टर ठरला (Deeol Band 2 Blockbuster Film)

'देऊळ बंद 2' हा सिनेमा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला.  या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला. या सिनेमाच्या कलेक्शनवरुन असे सिद्ध होते की,  चांगल्या स्टोरीचे सिनेमे पाहण्यासाठी प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी होतेच.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा सिनेमा अवघ्या 10 कोटींमध्ये तयार करण्यात आला आहे. या सिनेमाचे फायनल बॉक्स ऑफिस नेट कलेक्शन 85 कोटी इतके झाले आहे. ज्येष्ठ कलाकार मोहन जोशी अभिनीत हा सिनेमा 21 मे रोजी सिनेमागृहांमध्ये रिलीज झाला.  हा सिनेमा 2015 साली रिलीज झालेल्या  'देऊळ बंद' या  सिनेमाचा सिक्वेल आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

दुसऱ्या मंगळवारीही 'वेलकम टू द जंगल'चा धुरळा, बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस; इतके 'कोटी' कमावून राडा घातला