Deool Band 2 Box Office Collection Day 24: 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2' सारख्या सिनेमांना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर, मराठी चित्रपटसृष्टीला सुगीचे दिवस आले आहेत, असं म्हटलं तर, वावगं ठरणार नाही. 'राजा शिवाजी' या सुपरहिट ऐतिहासिक सिनेमानंतर 'देऊळ बंद 2' या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला.  'देऊळ बंद 2' या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली.  'देऊळ बंद 2' हा सिनेमा 21 मे 2026 रोजी रिलीज झाला. अवघ्या 23 दिवसांत या सिनेमानं कोट्यवधींच्या घरात कमाई करुन प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं. चौथ्या आठवड्यातही या सिनेमानं उत्तम कामगिरी केली आहे.  दरम्यान, 24 व्या दिवशी या सिनेमानं नेमकं किती कोटींचे कलेक्शन केले?  चौथ्या शनिवारी या सिनेमानं किती कोटींचा गल्ला जमवला? जाणून घेऊयात.

Continues below advertisement

देऊळ बंद 2 सिनेमानं चौथ्या आठवड्यात किती कोटींचे कलेक्शन केले? ( Day 24 Deool Band 2 Box Office Collection)

23 दिवसांनंतरही 'देऊळ बंद 2' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करताना दिसत आहे. 23 व्या दिवशी म्हणजेच चौथ्या शुक्रवारी या सिनेमानं 1.27 कोटींचे कलेक्शन केले. 725 शोजमधून या सिनेमानं कमाई केली.  तर,  24 व्या दिवशी म्हणजेच चौथ्या शनिवारी या सिनेमानं 1.40 कोटींचा गल्ला जमवला. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, 23 व्या दिवसाच्या तुलनेत 24 व्या दिवशी या सिनेमानं उत्तम कामगिरी केली आहे.  24 व्या दिवशी या सिनेमाचे 816 शोज पार पडले. 816 शोजमधून या सिनेमानं दमदार कमाई केली.

या सिनेमात मोहन जोशी आणि स्नेहल तरडे यांची मुख्य भूमिका आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणींवर आधारीत या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांच्या मनातील व्यथा या सिनेमात मांडण्यात आली आहे. त्यामुळे या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत ठेवली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतात या सिनेमानं आतापर्यंत 66.42 कोटींचे नेट कलेक्शन केले आहे.

Continues below advertisement

'देऊळ बंद 2' सिनेमात मोहन जोशी यांची मुख्य भूमिका आहे.  तर, स्नेहल तरडे यांचीही मुख्य भूमिका आहे. यासह प्रसाद ओक, महेश मांजरेकर, मंगेश देसाई, संस्कृती बालगुडे, अनिरुद्ध दिंडोरकर आणि रमेश परदेशी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर ज्या पद्धतीने घौडदौड सुरू आहे, हा चित्रपट लवकरच 80 कोटींचा टप्पा ओलांडेल, यात शंका नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्रसिद्ध यूट्यूबर - इन्फ्ल्युएंसरला घरात घुसून संपवलं; मेहुण्यानेच साथीदारांसह रचला कट, कारण काय?