Deool Band 2 Box Office Collection: मोहन जोशी (Mohan Joshi) आणि स्नेहल तरडे (Snehal tarde) अभिनीत 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) या सिनेमानं मराठी सिनेसृष्टीतील (Box Office Collection) अनेक रेकॉर्ड्स मोडीत काढले आहेत. या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर (Entertaiment) उत्तम घौडदौड सुरू आहे. दुसरा विकेंड सुरु असूनही, प्रवीण तरडे लिखीत आणि दिग्दर्शित या सिनेमानं शनिवारी कमाईत मोठी झेप घेतली आहे. तसेच 5 कोटींचे नेट कलेक्शन केले आहे. जी प्रदर्शनानंतरची दुसरी सर्वात मोठी एका दिवसाची कमाई ठरली आहे. हा एक कौटुंबिक सिनेमा असून, हा चित्रपट पुन्हा सिनेमागृहात पाहण्यासाठी प्रेक्षकांची थिएटरमध्ये गर्दी जमत आहे.
10 दिवसांत 'देऊळ बंद 2' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी (Marathi movie Deool Band 2 Latest Box Office Collection)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'देऊळ बंद 2' या सिनेमानं देशांतर्गत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या 9 दिवसांत या सिनेमानं 33.3 कोटी रुपयांची उल्लेखनीय नेट कलेक्शन केले आहे. दुसऱ्या आठवड्यातील दमदार कामगिरीचा वेग 10 व्या दिवशी कायम ठेवत, या सिनेमानं आदल्या दिवसाच्या तुलनेत तब्बल 61.21 % मोठी झेप घेतली. 1,941 शोजमधून या सिनेमानं 5 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले असल्याची माहिती आहे. जी पहिल्या शनिवारच्या कमाईपेक्षा 3.09% जास्त होती.
दरम्यान, दुसऱ्या शनिवारच्या या उल्लेखनीय कमाईमुळे, 'देऊळ बंद 2'ची भारतातील एकूण कमाई 38.30 कोटींवर पोहोचली आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमानं सातत्याने अपेक्षापेक्षा चांगली कामगिरी केली असून,दुसऱ्या आठवड्याच्या अखेरपर्यंत हा सिनेमा 40 कोटींचा टप्पा पार करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
'देऊळ बंद 2' सिनेमा कोणत्या विषयावर आधारीत? (Deool band 2 Cinema Massive growth in Box Office Collection)
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आधारीत या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांची होणारी फसवणूक, छळ, बनावट खतं, सरकारी अधिकाऱ्यांकडून होणारा छळ या वास्तवाची मांडणी या सिनेमात अगदी उत्तम पद्धतीने मांडण्यात आली आहे. या सिनेमात मोहन जोशी श्री स्वामी समर्थ यांची भूमिका साकारत आहेत. तर, विशेष म्हणजे स्नेहन तरडे यांचीही मुख्य भूमिका आहे. त्यांनी महिला शेतकरीची भूमिका साकारुन प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
ABP माझाच्या बातम्या LIVE..
