Deool Band 2: 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) सिनेमानंतर 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) या चित्रपटानं प्रेक्षकांना भूरळ घातली. हा सिनेमा 21 मे 2026 रोजी सिनेमागृहांमध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये रिलीज होऊन 26 दिवस पूर्ण झाले आहेत. दरम्यान, अजूनही या सिनेमाची क्रेझ काही कमी झालेली नाही. 25 व्या दिवशी म्हणजेच चौथ्या रविवारी या सिनेमानं 1.80 कोटींचे कलेक्शन केले होते. दरम्यान, सोमवारी या सिनेमाच्या कमाईत काही प्रमाणात घट झाली असल्याचं पाहायला मिळालं. प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमानं सोमवारी किती रुपयांचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.

Continues below advertisement

मोहन जोशी आणि स्नेहल तरडे यांची महत्त्वाची भूमिका असलेल्या 'देऊळ बंद 2' या सिनेमाची हवा सध्या बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळत आहे.  11 वर्षांपूर्वी  'देऊळ बंद' हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमालाही तितकाच प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळाला होता.  दरम्यान, आता  'देऊळ बंद 2' या सिनेमालाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.  हा सिनेमा रिलीज होऊन 20 दिवस पूर्ण झाले आहेत. तरी देखील या सिनेमाची क्रेझ काही कमी झालेली नाही.

रविवारनंतर सोमवारीही 'देऊळ बंद 2' सिनेमानं उत्तम कामगिरी केली (Deool Band 2 Cinema Box Office Collection Monday)

26 व्या दिवशी म्हणजेच सोमवारी या सिनेमानं 50 लाखांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. सोमावारी या सिनेमाचे 879  शोज पार पडले होते. 879 शोजमधून या सिनेमानं 50 लाखांचं  बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. या सिनेमानं आतापर्यंत भारतात 68.72 कोटींचे कलेक्शन केले आहे.  10 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमानं 60 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हा सिनेमा लवकरच 80 कोटींचा टप्पा गाठेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Continues below advertisement

11 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'देऊळ बंद' या सिनेमाचा हा सिक्वेल आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आत्महत्या या मुद्द्यांवर हा सिनेमा आधारीत आहे.   या सिनेमातून ग्रामीण भागातील गंभीर वास्तव दाखवण्यात आलं आहे.    या सिनेमात ज्येष्ठ कलाकार मोहन जोशी, स्नेहल तरडे, प्रवीण तरडे यांच्या मुख्य भूमिका आहेत.   या सिनेमात मोहन जोशी यांनी श्री स्वामी समर्थ यांची भूमिका साकारली आहे.  या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमानं दमदार चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. लवकरच हा सिनेमा आणखी किती सिनेमांचे रेकॉर्ड मोडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

जैनांच्या 'पांढऱ्या पट्टी'चा वाद आणखी चिघळला; धमक्यांनंतर प्रसाद वेदपाठकचा मोठा निर्णय, थेट मनसे दरबारी जाणार