Delhi: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबर, सोमवारी झालेल्या कार बॉम्ब स्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. संध्याकाळी सुमारे 6 वाजून 52 मिनिटांनी रेड फोर्ट मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ एका कारमध्ये जोरदार स्फोट झाला. या भीषण घटनेत आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात अभिनेत्री पायल घोषची (Payal Ghosh) जिवलग मैत्रीण सुनीता मिश्रा हिचाही मृत्यू झाला असून, अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिनं आपली भावना व्यक्त केलीय.

Continues below advertisement

या दुर्दैवी घटनेनंतर पायल घोषने सर्व नागरिकांना स्फोटात मृत पावलेल्या आणि जखमी झालेल्या लोकांच्या कुटुंबांना मदतीचा हात देण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी जाहीर केले आहे की, मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये, कायमस्वरूपी अपंग झालेल्यांना 5 लाख रुपये, तर गंभीर जखमींना 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल.

Delhi Blast: "एकत्र स्वप्न पहिली, संघर्ष केला..." 

‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत पायल घोष म्हणाली, “ती माझ्यासाठी फक्त मैत्रीण नव्हती, ती माझ्या कुटुंबाचा भाग होती. आम्ही लहानपणापासून एकत्र वाढलो, हसलो-खेळलो, आणि आयुष्यातील सगळ्या सुखदुःखात एकत्र होतो. तिचं असं अचानक जाणं मी शब्दात मांडू शकत नाही. आम्ही दोघी एकत्र मोठ्या झालो, एकत्र स्वप्नं पाहिली आणि संघर्षही केला. तिचं जाणं म्हणजे माझ्या आयुष्यातील मोठा धक्का आहे.” 

Continues below advertisement

पायल घोषने पुढे सांगितले, “मला अजूनही विश्वास बसत नाही की ती आता नाही. ती अतिशय दिलखुलास होती, नेहमी हसतमुख राहायची आणि सगळीकडे सकारात्मकता पसरवायची. इतक्या चांगल्या व्यक्तीचा इतक्या क्रूर पद्धतीने अंत झाला, हे मनाला हादरवणारं आहे. ती माझ्यासाठी फक्त मैत्रीण नव्हती, तर कुटुंबासारखी होती. आम्ही एकत्र स्वप्न पाहिली, संघर्ष केले आणि एकमेकांना नेहमी साथ दिली. तिचं असं जाणं शब्दात व्यक्त करता येणार नाही. असंही ती म्हणाली.

Payal Ghosh: पायल घोष कोण आहे?

पायल घोषने तेलुगू आणि कन्नड चित्रपटसृष्टीत काम केलं आहे. त्याशिवाय ती हिंदी चित्रपट ‘कोई जाने ना’ मध्ये झळकली होती. तसेच लोकप्रिय टीव्ही शो ‘साथ निभाना साथिया’ मध्ये ती राधिका या भूमिकेत दिसली होती. अभिनय क्षेत्रात सक्रिय असलेली पायल सध्या आपल्या जिवलग मैत्रिणीच्या निधनामुळे अत्यंत दुःखी असून, या घटनेने बॉलिवूड आणि चाहत्यांनाही चटका लावला आहे. अनेक कलाकारांनी दिल्ली ब्लास्टवरून पोस्ट टाकल्याचं दिसून आलं.