Deepika Padukone Ranveer Singh Pregnancy Photoshoot: बॉलिवूडचा (Bollywood News) 'धुरंधर' रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांनी आपली गोंडस मुलगी दुआ सिंह-पादुकोणसोबतचे (Dua Singh-Padukone) काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. या ब्लॅक अँड व्हाइट फोटोंमध्ये दुआ तिच्या सुपरस्टार आई-बाबांसोबत दिसतेय. तसेच, दीपिकानं या फोटोंमध्ये बेबीबंपसुद्धा फ्लॉन्ट केलाय.
फोटोंमध्ये, दीपिका-रणवीर, तर चिमुकली दुआ तिच्या गोंडस हावभावांनी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. एका फोटोमध्ये, ती तिच्या आई-वडिलांसोबत खेळताना आपला चेहरा लपवताना दिसतेय, तर दुसऱ्या फोटोमध्ये, ती रणवीर आणि दीपिकासोबत मनसोक्त हसताना दिसतेय.
रणवीर-दीपिकानं दाखवला दुआचा गोंडस चेहरा (Deepika Padukone Ranveer Singh Photoshoot)
रणवीर सिंहनं इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केलेत आणि दीपिकाला टॅग करत लिहिलंय की, "बेबी दुआ आणि आमचं मन खूप मोठं होतंय... तुम्हा सर्वांच्या आशीर्वादासाठी धन्यवाद...!"
दोन वर्षांची झाली चिमुकली दुआ... (Dua Singh-Padukone Photoshoot With DeepVeer)
खरंतर 8 सप्टेंबरला रणवीर-दीपिकाची दुआ (Dua Padukone Singh) दोन वर्षांची झाली असून तिनं दुसरा वाढदिवस साजरा केला. रणवीर आणि दीपिकानं 2024 मध्ये आपल्या मुलीचं स्वागत केलेलं आणि त्यानंतर सांगितलं की, त्यांनी तिचं नाव 'दुआ' ठेवलंय. कारण, ती त्यांच्या प्रार्थनांना मिळालेलं उत्तर होतं.
एप्रिलमध्ये रणवीर-दीपिकाकडून दुसऱ्या प्रेग्नेन्सीची घोषणा (Deepika Padukone Second Pregnancy)
एप्रिल 2026 मध्ये, 'दुआ'नं 'पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी टेस्ट' हातात धरलेली एक अतिशय गोंडस पोस्ट शेअर करून या जोडप्यानं दुसऱ्या गरोदरपणाची घोषणा केली होती. आता, कुटुंबातील नव्या फोटोंमुळे चाहत्यांना या खास टप्प्याची झलक पाहायला मिळाली आहे, कारण 'दुआ' आता मोठी बहीण बनण्याच्या तयारीत आहे.
अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर, दीपिका आणि रणवीर यांनी 2018 मध्ये इटलीमध्ये लग्न केलं. त्यांनी त्यांचं पहिलं अपत्य, 'दुआ' सप्टेंबर 2024 मध्ये जन्माला आली.
दरम्यान, दीपिका आणि रणवीरच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, दोन मोठ्या प्रोजेक्ट्समधून माघार घेतल्यानंतर, दीपिका पादुकोण शाहरुख खानच्या 'किंग' (King) सिनेमात काम करणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. या सुपरस्टारसोबतचा तिचा हा सहावा सिनेमा असेल. अलिकडेच सिनेमाच्या सेटवरील काही फोटो ऑनलाइन समोर आले आहेत, ज्यामुळे चाहत्यांमधील उत्सुकता अधिकच वाढली आहे.
