Deepika Padukone Pregnant Ranveer Singh: रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. दीपिकाने एका गोंडस फोटोसह तिच्या दुसऱ्या गरोदरपणाची घोषणा केली आहे. दुवाच्या जन्मानंतर दोन वर्षांनी दीपिका पदुकोण पुन्हा मातृत्व अनुभवणार आहे. एक खास पोस्ट करत तिने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. या खास पोस्टवर दीपिका आणि रणवीरवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एकीकडे व्यावसायिकदृष्ट्या धुरंधर 2 मधील रणवीरच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक होत आहे. दरम्यान रणवीर दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. ( Deepika Padukone 2nd Pregnancy)
दीपिका पदुकोणने तिचा instagram अकाउंट वर एक फोटो शेअर केलाय. या फोटोत मांडीत बसलेल्या दुवाच्या हातात प्रेग्नेंसी किट दिसतंय. दीपिकाने कॅप्शनमध्ये फक्त इव्हल आय इमोजी टाकलाय. या फोटोवर चाहत्यांपासून सेलिब्रेटिंपर्यंत सर्वजण या दोघांवर अभिनंदनचा वर्षाव करतयत.
दीपिका अनुभवणार दुसऱ्यांदा मातृत्व
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे बॉलीवूड मधील सर्वात लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. 2018 मध्ये दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर सहा वर्षांनी म्हणजेच 8 सप्टेंबर 2024 रोजी रणवीर आणि दीपिकाला कन्यारत्न प्राप्त झाले. दुवानंतर आता दोन वर्षांनी दीपिका पुन्हा आई होणार आहे. दुवाला लहान भावंड येणार असल्याने तिच्याकडून दीपिका आणि रणवीरने ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे.
दीपिका आणि रणवीर च्या पोस्टवर अनेक सेलिब्रेटी भरभरून शुभेच्छा देत आहेत. परिणीती चोप्रा, अनन्या पांडे, समंथा रुथ प्रभू, कियारा अडवाणी तसेच चाहतेही आनंद व्यक्त करत आहेत. दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
दोघांचे आगामी प्रोजेक्ट कोणते?
दीपिकाच्या कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ती शेवटची अजय देवगणच्या सिंघम अगेन या चित्रपटात दिसलेली. तेव्हापासून ती प्रसिद्धीपासून दूर आहे. मात्र दीपिकाकडे आगामी अनेक प्रोजेक्ट असल्याचं बोललं जातंय. ती शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित किंग आणि अल्लू अर्जुन चा आगामी राका या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर रणवीर सिंह धुरंधर आणि धुरंधर 2 च्या यशानंतर आगामी प्रलय या चित्रपटात दिसणार आहे.
