Deepika Ranveer Look: बॉलिवूडचं पॉवर कपल दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या दोघांनी नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो ‘Visit अबू धाबी’ या मोहिमेच्या जाहिरातीसाठीचा भाग आहे. व्हिडिओमध्ये दोघेही अबू धाबीच्या सुंदर लोकेशन्सचा आणि संस्कृतीचा अनुभव घेताना दिसत आहेत.

या प्रवासादरम्यान दीपिकानं हिजाब आणि अबाया परिधान केला असून रणवीरही वाढलेल्या दाढीत पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे. दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि चाहत्यांकडून यावर जबरदस्त प्रतिक्रिया येत आहेत.

“तू तर म्युझियममध्ये ठेवण्यासारखा आहेस”: दीपिका

व्हिडिओची सुरुवात एका म्युझियममध्ये ठेवलेल्या प्राचीन कलाकृतीपासून होते. रणवीर म्हणतो, “९० ए.डी. मध्ये इतकी बारीक कामगिरी झाली असेल यावर विश्वासच बसत नाही.” त्यावर दीपिका हसत म्हणते, “तू तर स्वतः म्युझियममध्ये ठेवण्यासारखा आहेस.”

दोघांमधील हे मजेशीर संवाद चाहत्यांना खूप आवडले . त्यानंतर ते अबू धाबीच्या शांत आणि मोहक ठिकाणी दोघेही फिरताना दिसतात. रणवीर म्हणतो, “काही ठिकाणं आपल्याला फक्त ऐकण्याची संधी देतात.” यावर दीपिका प्रत्युत्तर देते, “असं वाटतं की शांततेतही कोणीतरी बोलतंय.” शेवटी दीपिका म्हणते, “आपण जग पाहायला जातो, पण काही वेळा आपण स्वतःलाच पाहतो.”

पालकत्वानंतरचा पहिला प्रोजेक्ट

‘सिंघम अगेन’नंतर हे रणवीर आणि दीपिकाचं पहिलं एकत्र काम आहे. विशेष म्हणजे, मुलीच्या जन्मानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रोफेशनल प्रोजेक्ट आहे. दीपिकानं ८ सप्टेंबर २०२४ रोजी मुलीला जन्म दिला असून तिचं नाव ‘दुआ’ ठेवलं आहे. अजूनही त्यांनी तिचा चेहरा चाहत्दायांना दाखवलेला नाही. पण सोशल मिडीयावर ती तिच्या कामाविषयी बऱ्याच स्टोरी शेअर करत असते.

दीपिकाच्या हिजाबवर फॅन्स फिदा

दीपिकाच्या हिजाब लूकवर नेटिझन्स अक्षरशः फिदा झाले आहेत. एका युजरने लिहिलं, “हिजाबमध्ये ती अप्रतिम दिसते.” दुसरा म्हणतो, “या सुंदर हिजाबमुळे तिचं ग्लॅमर आणखीन खुललं.” तर आणखी एका चाहत्याने लिहिलं, “अरब संस्कृतीचा आदर आणि दीपिकाचा तो हिजाब  तिच्या सौंदर्याला वेगळीच झळाळी देतो.”