दीपाली सय्यदच्या कुटुंबावर दुःखद प्रसंग, गेम बघून घरच्यांनी सत्य लपवलं, अभिनेत्रीचा नवरा म्हणाला...
ती घरात असताना तिच्या कुटुंबावर वाईट प्रसंग आलाय.दीपाली सय्यदचे पती बॉबी यांनी नुकतीच एका मुलाखतीत या घटनेची माहिती दिली.

Deepali Sayyad: सध्या बिगबॉस मराठीचा सहावा सिझन चांगलाच रंगलेला दिसतोय. या शोमध्ये प्रत्येकजण आपापल्या शैलीत, आपापल्या ताकदीवर खेळताना दिसतोय. बिगबॉसच्या घरात बंद असणाऱ्या कलाकारांना बाहेरच्या दुनियेत काय घडतंय याचा अंदाज नाहीय. त्यांचं लक्ष आपला गेम कसा टॉप असेल, आपण चर्चेत कसे राहू यावर दिसतोय. पण बाहेरच्या जगात त्यांच्या कुटुंबात घडणाऱ्या घटनांविषयी स्पर्धक पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. बिग बॉसच्या घरात असलेल्या दीपाली सय्यदच्या कुटुंबावरही सध्या दुःखाचा डोंगर कोसळलाय. पण तिच्या कुटुंबियांनी ही गोष्ट दीपालीपासून लपवून ठेवली आहे. अभिनेत्री आणि राजकारणात सक्रीय असलेली दीपाली सय्यद सध्या बिग बॉसच्या घरात उत्तम गेम खेळतेय. पण ती घरात असताना तिच्या कुटुंबावर वाईट प्रसंग आलाय.दीपाली सय्यदचे पती बॉबी यांनी नुकतीच एका मुलाखतीत या घटनेची माहिती दिली.
ती दीपालीच्या फार जवळची
दीपाली सय्यदचे पती बॉबी आणि तिचा मुलगा यांनी अलिकडेच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत दीपालीच्या सासूचे निधन झाल्याचं सांगितलं. तो म्हणाला, हल्लीच माझी आई वारली. ती दीपालीच्या फार जवळची होती. ती दीपालीला मुलगीच मानायची. माझी आई कायम म्हणायची, तू बिग बॉस जिंकशील तेव्हा मी नक्की येईन. आम्ही तिला ही गोष्ट अजून सांगितली नाही कारण ती खूप चांगलं खेळतेय. खेळासोबत जे झालं ते झालं. माझ्या आईला कायम दीपालीची साथ लागायची. डॉक्टरकडे जायचं असेल तेंव्हा दीपालीच तिला घेऊन जायची. असं दीपाली सय्यदच्या नवऱ्याने सांगितलं.
काय म्हणाला दिपालीचा नवरा?
तो पुढे म्हणाला, आता मी दीपालीला मिस करतोय.कारण आता सगळे निर्णय मलाच घ्यावे लागतायत. माझी आई २ फेब्रुवारीला वारली.त्यामुळे मी दीपालीला सांगितलं नाही. तिला हे कळल्यावर खूप धक्का बसेल. जेव्हा आई शेवटचं बोलायची नाही तेंव्हा दीपालीचा आवाज आम्ही तिला ऐकवायचो. आम्हाला वाटलंच नव्हतं, असं काही होईल. कारण दोनवेळा आई ॲडमिट होती.आणि परतही आलेली. यावेळीही असंच वाटलं होतं. म्हणून काही बोललो नाही. दीपालीने कायम पुढे जावं अशी माझ्या अईची इच्छा होती. असंही बॉबी यांनी सांगितलं.
दीपालीचा मुलगा अली म्हणाला, आजी आणि आई सगळं बघायच्या. पप्पा जास्त लक्ष नाही द्यायचे. शेवटपर्यंत आजी पप्पा आणि आईलाच शोधत होती. असंही तो म्हणाला.
























