Danny Pandit zatpat Patapat: सोशल मीडियावर स्क्रोल करताना सध्या एकच गाणं ट्रेंडिंग आहे ते म्हणजे डॅनी पंडितचं (Danny Pandit)'झटपट पटापट ..' गाणं. धम्माल विनोदी रॅप स्टाईलमध्ये केलेल्या गाण्यानं सोशल मीडियावर लोकांना अक्षरशः थिरकायला लावलं. या रीलचा इतका नाद लागला की चाहत्यांनी या गाण्याच्या इफेक्टवरून नव्याने रील्स केले. दरम्यान, आता रांगोळीचे साचे दाखवणाऱ्या OG काकांसोबत डॅनी पंडीतनं नवा व्हिडिओ केलाय. हा व्हिडिओही बघता बघता व्हायरल झालाय. 'झटपट पटापट' याच शीर्षकाखाली केलेल्या या गाण्याला चाहत्यांनी डोक्यावर घेतलंय.
दिवाळीमध्ये रांगोळी विक्रेत्या काकांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ते हे झटपट पटापट कडवं म्हणत होते. त्यावरून क्रियेटर डॅनी पंडितनं एक विनोदी रिल बनवलं , जे बघता बघता व्हायरल झालं. आता जे काका रांगोळीचे साचे दाखवताना हे कडवं म्हणत होते त्यांना घेऊन त्यांनी पंडितने गाणं बनवलंय. OG काकांना क्रेडिट दिल्यामुळे चाहते डॅनी पंडित कौतुकही करतायत.
चाहत्यांच्या धम्माल कमेंट्स
डॅनी पंडितच्या या व्हिडिओला अक्षरशः डोक्यावर घेतलंय. नेटकरी या व्हिडिओवर धमाल कमेंट्स करताना दिसतात. OG in the house, एक नंबर, मनःशांती, डॅनी पंडितचा आतापर्यंतचा सर्वात धमाल कोलॅब अशा कमेंटसचा पाऊस पाडलाय. 2025 चा सर्वात बेस्ट व्हिडिओ असं म्हणत चाहत्यांनी ओजी काकांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
झटपट पटापट गाणं आता सर्व सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. जर तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल तर तुम्ही डॅनी पंडितचे व्हिडिओ नक्कीच पाहिले असतील.
डॅनी पंडित सोशल मीडियातून किती कमावतो?
डॅनी पंडित कायमच त्याच्या व्हिडिओमध्ये विनोद, रॅपिंग आणि अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. सोशल मीडिया, युट्यूबवर भन्नाट व्हिडिओ बनवतो. पंडितची एकूण संपत्ती अंदाजे 7 कोटी रुपये आहे. कंटेट क्रियेशनमधून डॅनी महिन्याला लाखो रुपये कमवतो. त्याचे मासिक उत्पन्न अंदाजे 1 ते दीड लाख रुपये आहे.