Sanya Malhotra buy House in Mumbai: प्रत्येक व्यक्तीचं मुंबईत स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न असतं. विशेषतः प्रत्येक कलाकाराला मायानगरीत आपलं घर असावं असं कायम वाटत असतं. अनेक जण आपल्या मेहनतीने आणि परिश्रमानं हे स्वप्न साकार करतात. सध्या दंगल गर्ल सानिया मल्होत्रा या अभिनेत्रीचं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालंय. वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी तिने कोट्यावधींचा आलिशान घर घेतला आहे. आपल्या घराचे काही फोटोही तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. (Sanya Malhotra New House)
बॉलीवूडच्या दंगल चित्रपटात सान्याने बबीता फोगाटची भूमिका साकारली होती. पहिल्याच चित्रपटातून सान्या मल्होत्रा प्रचंड लोकप्रिय झाली. नंतर अनेक चित्रपटांमधून तिने आपलं अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे . कठल, Mrs, दंगल अशा अनेक चित्रपटांमधून दमदार अभिनयातून सान्याने बॉलीवूडमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवला. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर दंगल गर्लने मुंबईत स्वतःच नवं घर खरेदी केलं आहे. आपल्या जवळच्या मित्र परिवाराला आणि कुटुंबासमवेत तिने गृहप्रवेश केला. तिच्या नव्या घराची झलक शेअर करत आपल्या अनेक वर्षाच्या स्वप्नांना मेहनतीला आणि शिकवण आज पूर्णत्वास गेल्याच तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
काय म्हणाली सान्या मल्होत्रा?
ती म्हणाली," हर हर महादेव ,कित्येक वर्षांची स्वप्नं, मेहनत, शिकणं आणि स्वतःला घडवण्याचा प्रवास...या घराची प्रत्येक भिंत मला नेहमी आठवण करून देईल की संयम आणि विश्वास याचं फळ किती सुंदर असू शकतं.या संपूर्ण प्रवासात माझ्या कुटुंबाचा आणि मित्रांचा विश्वास हीच माझी सर्वात मोठी ताकद होती.हे फक्त एक घर नाही…हा माझ्या प्रवासाचा एक छोटासा, पण खूप खास भाग आहे.माझ्या घरी तुमचं स्वागत.असं तिने लिहिलं.
चाहत्यांच्या कमेंट्स
सान्या मल्होत्राच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी तसेच तिच्या सहकलाकार आणि अनेक सेलिब्रेटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 2023 मध्ये सान्याने गुडगाव मध्येही तिने एक घर खरेदी केले होते. त्यानंतर आता मुंबई इथे तिने स्वतःच घर घेतलं आहे. हे घर अतिशय प्रशस्त असून तिच्या घरातून समुद्राचं सुंदर दृश्य दिसतं. अभिनयाची कोणतेही पार्श्वभूमी नसताना तिने मुंबईत आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे. या घराची किंमत साधारणपणे 14.3 कोटी रुपये सांगितले जाते.
