Gautami Patil About Team Rules: सबसे कातिल गौतमी पाटीलचा (Gautami Patil) चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिनं अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. गौतमीने (Viral) स्टेज परफॉर्मन्स देत अल्बम साँग आणि मालिकांमध्येही काम केलं आहे.  अलिकडेच तिचा भाऊ कदम यांच्यासोबतचा 'हिल हिल पोरी हिला' हे गाणं रिलीज झालं होतं.  या गाण्यातून भाऊ कदम आणि गौतमी पाटील ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. दरम्यान, अल्बम साँग (Entertainment) आणि मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली असली तरी, गौतमीने स्टेज परफॉर्मन्स करायचं काही सोडलं नाही. गौतमी एकटी नाही तर, तिच्यासोबत पूर्ण टीम असते. टीमसाठी तिनं काही कडक नियम ठेवले आहेत. ते नियम नेमके आहेत तरी कोणतेो? याचा खुलासा गौतमी पाटीलने केला आहे.

Continues below advertisement

गौतमी पाटीलच्या ग्रुपमधील कडक नियम (Gautami Patil Opens Up About the Discipline and Rules)

सौमित्र पोटेंच्या मित्र म्हणे पॉडकास्टला अलिकडेच गौतमी पाटीलने मुलाखत दिली होती. तिनं या मुलाखतीत आपल्या टीमबद्दलचे अनेक खुलासे केले आहेत. गौतमी पाटील म्हणाले, 'माझ्या टीममध्ये मी खूप स्ट्रीक्ट आहे. बऱ्याच रुल्स आहेत. मी व्हॅनिटी बाहेर मुलींना जास्त जाऊ देत नाही. व्हॅनिटीतच थांबायचं. कार्यक्रम सुरू झाल्यानंतरच बाहेर पडायचं. बॅक डान्सरसोबत काही बाऊन्सर असतात'.

'मला जे पटत नाही, ते आमच्या टीममधील पोरी करत नाही. माझ्या टीममधील मुली माझ्या शब्दांच्या बाहेर नाहीत. माझ्या ग्रुपमध्ये लफडं किंवा कुणाचेच रिलेशनशिप मी खपवून घेत नाही. मला या गोष्टी आवडत नाही. मु्ंबईच्या मुली माझ्यासोबत पुण्यात असतात. माझ्यावर त्यांची जबाबदारी आहे. त्या मुलींची फॅमिली आहे. त्यांना आई - वडील आहेत.  मुलींची जबाबदारी असते. त्यांच्या कुटुंबाचा माझ्यावर विश्वास असतो. मी स्ट्रीक्ट आहे. काम तर काम करायचं. जेवण केल्यानंतर लगेच आपआपल्या व्हॅनिटीमध्ये जाऊन मी मुलींना बसायला सांगते'.

Continues below advertisement

'इकडे फिर तिकडे फिर.. व्हिडीओ काढ किंवा काय, असलं मला आवडत नाही. मुलींनी फक्त कामच करायचं, असे माझे काही नियम आहेत.  बाहेर फिरायला गेल्यानंतर मी मुलींना थोडी सूट देते. मुली पण मला विचारुन गोष्टी करतात', असं गौतमी पाटील म्हणाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'साईबाबांच्या पोथीत पंतप्रधान मोदीजींचा फोटो, रोज पूजा अन् लाडू...'; सुनील शेट्टींचा 15 महिन्यांच्या नातीबद्दल भावनिक खुलासा