Dakota Johnson And Chris Martin Breakup: भारतात अलिकडेच प्रसिद्ध बँड 'कोल्डप्ले' (Famous Band Coldplay) कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलेलं. संपूर्ण देश सगळं काही विसरुन 'कोल्डप्ले'च्या (Coldplay Concert) तिकीट मिळवण्यासाठी धडपड होता. सध्या तरुणाईच्या काळजात घर केलेला प्रसिद्ध बँड 'कोल्डप्ले'चा फ्रंटमन ख्रिस मार्टिन (Coldplay frontman Chris Martin) भारतात आलेला. त्यानं भारतभरात वेगवेगळ्या ठिकाणी कॉन्सर्ट (Coldplay) सादर केल्या. यावेळी 'कोल्डप्ले'चा फ्रंटमन ख्रिस मार्टिनसोबत गर्लफ्रेंड आणि हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री डकोटा जॉन्सनदेखील (Famous Hollywood actress Dakota Johnson) भारतात आली होती. कॉन्सर्टव्यतिरिक्त हे स्टार कपल संपूर्ण भारतभरात हातात हात घालून फिरताना पाहायला मिळालं. दोघांनी कुंभमेळ्यालाही (Maha Kumbh) हजेरी लावली होती. त्यावेळी ही जोडी प्रचंड चर्चेचा विषय ठरलेली. अनेकांनी या जोडीला 'एक दुजे के लिए' म्हणत संबोधलं होतं. पण, अखेर ख्रिस मार्टिन आणि डकोटा जॉन्सन यांच्या नात्याला कुणाची तरी नजर लागलीच. दोघांनीही ब्रेकअप (Dakota Johnson And Chris Martin Breakup) केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच, दोघांच्या ब्रेकअपचं अत्यंत धक्कादायक आणि हादरवणारं कारणंही समोर आलं आहे. 


Dakota Johnson And Chris Martin Breakup: 8 वर्षांपासूनचं नातं का संपवलं? 


तबब्ल आठ वर्ष एकत्र राहिल्यानंतर, 'कोल्डप्ले'चा फ्रंटमन क्रिस मार्टिन आणि हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री डकोटा जॉन्सन यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. असं म्हटलं जातंय की, दोघांचं ब्रेकअप झालंय आणि यावेळी ते अंतिम असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, दोन्ही स्टार्स किंवा त्यांच्या टीमकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.


सुत्रांनी PEOPLE ला दिलेल्या माहितीनुसार, डकोटा जॉन्सन आणि ख्रिस मार्टिन आता एकत्र नाहीत, दोघांचाही ब्रेकअप झाला आहे. ते सुमारे 8 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. जानेवारी 2025 मध्ये कोल्डप्लेच्या दौऱ्यादरम्यान दोघेही मुंबईत एकमेकांचे हात धरून दिसले होते. या प्रवासादरम्यान, दोघेही महाकुंभातही सहभागी झाले होते. 


Dakota Johnson And Chris Martin News: या कारणामुळे ख्रिस मार्टिन आणि डकोटा जॉन्सनचा ब्रेकअप? 


35 वर्षांची डकोटा आणि 48 वर्षांचा क्रिस यांच्या ब्रेकअपचं कारण समोर आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वयाच्या फरकामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. डकोटाला मूल हवं होतं, पण क्रिसनं आधीच त्याच्या आयुष्याचा हा भाग जगला आहे, त्याला आधीच दोन मुलं आहेत. अशा परिस्थितीत, असं म्हटलं जातंय की, ख्रिसनं मुलांसाठी स्पष्ट नकार दिला, त्यामुळेच डकोटानं त्याच्या नकारामुळे त्याच्याशी ब्रेकअप केलं असावं. 


Coldplay frontman Chris Martin Breakup: 2017 पासून दोघांच्याही डेटिंगच्या चर्चा 


डकोटा आणि ख्रिस 2017 पासून एकमेकांना डेट करत होते. त्यांनी त्यांचं नातं बऱ्याच प्रमाणात खाजगी ठेवलेलं. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या ब्रेकअपची बातमी येण्याच्या फक्त दोन आठवड्यांपूर्वीच ते मालिबूमध्ये एकत्र दिसले होते. आणि ते एकत्र खूप आनंदी देखील होते. दोघांमध्ये काही तणाव आहे, असं कुणालाच जाणवलं नव्हतं. 


Hollywood Actress Dakota Johnson Breakup: लग्न करण्याची घाई नव्हती, साखरपुड्याची चर्चा रंगलेली


या वर्षाच्या सुरुवातीला, सुत्रांनी पीपलला दिलेल्या माहितीनुसार, डकोटा आणि ख्रिस अनेक वर्षांपासून एकत्र आहेत, परंतु त्यांना लग्न करण्याची घाई नव्हती. पण, दोघेही एन्गेजमेंट करणार असल्याचं बोललं जात होतं. 2020 मध्ये दोघेही एन्गेजमेंट करणार असल्याचं बोललं जात होतं.  


Celebrity Couple Breakup: गेल्या वर्षीही नात्यात दुरावा, घेतलेला ब्रेक 


ऑगस्ट 2024 मध्येही दोघांच्या ब्रेकअपच्या अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर डकोटाच्या टीमनं हे दावे फेटाळून लावले. त्यांनी आम्ही एकत्र असल्याचं सर्वांना सांगितलं. त्यावेळी एका सूत्रानं सांगितलेलं की, 'अर्थात, त्यांना पूर्वी काही समस्या होत्या आणि त्यांनी ब्रेक देखील घेतला होता, पण आता सर्व काही ठीक आहे. ते शक्य तितके सर्वकाही बॅलेन्स करत आहेत.' डकोटानं क्रिसची मुले अ‍ॅपल आणि मोझेस यांच्याशीही चांगले संबंध ठेवलेत. क्रिसची ही दोन्ही मुले त्याच्या मागील लग्नातील आहेत. त्याचं लग्न ग्वेनेथ पॅल्ट्रोशी झालं होतं.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


A Widow's Game: पत्नीनं प्रियकरासोबत कट रचला अन् पतीला संपवलं, विधवा असल्याचं घेतलं सोंग; नेटफ्लिक्सवर पाहू शकता 'ही' क्राईम-थ्रीलर सीरिज