Dadasaheb Phalke International Film Festival Awards 2024 Winners : दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा बॉलिवूडमदील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यांपैकी एक आहे. बॉलीवूड आणि टीव्ही जगतातील स्टार्स या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात, कारण वर्षभर केलेल्या मेहनतीचे फळ या पुरस्काराच्या रूपाने मिळतं. मंगळवारी मुंबईमध्ये या पुरस्कार सोहळ्याचं वितरण झालं. बॉलिवडूचा किंग खान शाहरुख खान याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आले. जवान चित्रपटासाठी शाहरुख खान याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणूनरस्कार प्रदान करण्यात आला. शाहरुख खानं यानं ज्यूरीचं आभार व्यक्त केले. बॉबी देओल आणि संदीप रेड्डी वांगा यांना अॅनिमल चित्रपटासाठी गौरवण्यात आले. 


दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचं मंगळवारी मुंबईमध्ये अनावरण झालं. या सोहळ्याला शाहरुख खान, राणी मुखर्जी, बॉबी देओल, शाहीद कपूर आणि नयनतारा यांच्यासह बॉलिवूड आणि टॉलिवूडच्या कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती. पुरस्कार सोहळ्यावर अॅनिमल आणि जवान या चित्रपटाचं वर्चस्व दिसलं. त्याशिवाय विकी कौशल यालाही सॅम बहादुर या चित्रपटासाठी गौरवण्यात आलं. 


Dadasaheb Phalke Awards 2024 Winners List - दादासाहेब फाळके 2024 पुरस्कार 


सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान (जवान)
Best Actor: Shah Rukh Khan (Jawan)


सर्वोतृष्ट अभिनेत्री : यनतारा  (जवान)
Best Actress: Nayanthara (Jawan)


सर्वोत्कृष्ट खलनायक (निगेटिव्ह रोल) - बॉबी देओल (अनिमल)


Best Actor in Negative Role: Bobby Deol (Animal)


सर्वोतृष्ट दिगदर्शक - संदीप रेड्डी वांगा (अॅनिमल)


Best Director: Sandeep Reddy Vanga (Animal)


सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक) - विकी कौशल (सॅम बहादुर)


Best Actor (Critics): Vicky Kaushal (Sam Bahadur)





ओटीटीवर कुठे पाहाल पुरस्कार सोहळा ?


ZEE5 या OTT प्लॅटफॉर्मवर दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2024 पाहायला मिळेल.  


शाहरुखसाठी 2023 वर्ष खास - 


बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याच्यासाठी 2023 हे वर्ष खूप चांगले होते. 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' हे त्यांचे चित्रपट प्रदर्शित झाले. राजकुमार हिरानीच्या चित्रपटाशिवाय ॲटलीच्या 'जवान' आणि सिद्धार्थ आनंदच्या 'पठाण'ने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली. नयनताराने 'जवान'मध्येही दमदार अभिनय केला, त्यामुळेच तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर शाहरुख खान यानं सर्वोतृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला.