Dada Kondke Movies Zee Talkies : मराठी सिनेसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण करणारे, चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे दादा कोंडके यांचे चित्रपट आजही लोकप्रिय आहेत. ब्लॅक अॅण्ड व्हाईटमध्ये रिलीज झालेल्या दादा कोंडके यांच्या चित्रपटांचा आजही चाहता वर्ग आहे. आता, दादा कोंडकेंचे क्लासिकल 'ब्लॅक अँड व्हाइट' मराठी चित्रपट रंगीत रूपात प्रेक्षकांना पाहता येणार आहे. झी टॉकीजवर हे चित्रपट पाहता येणार आहे. 


दादा कोंडके यांच्या काही लोकप्रिय आणि अविस्मरणीय चित्रपटांना झी टॉकीजने रंगीत स्वरूपात सादर करून प्रेक्षकांना नवीन आनंद दिला आहे."पांडू हवालदार", "आंधळा  मारतो डोळा", "एकटा जीव" आणि "सोंगाड्या" हे दादा कोंडके यांचे चित्रपट आता झी टॉकीजवर रंगीत स्वरूपात पाहायला मिळणार आहे. 






दादा कोंडके यांच्या चित्रपटांमध्ये हास्यविनोद, गाणी आणि संवाद आजही तितकेच ताजे वाटतात. त्यांच्या चित्रपटांचे रंगीत रूपांतर प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय ठरत आहे. याआधी इतर टेलिव्हिजनवर हिंदी चित्रपट "मुघल-ए-आझम" आणि "श्री 420" यांना देखील रंगीत स्वरूपात सादर करण्यात आले होते. प्रेक्षकांनी याला चांगला प्रतिसाद दिला होता.  दादा कोंडके यांच्या चित्रपटांना महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी नेहमीच चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्यांच्या चित्रपटांचे गाजलेले संवाद आणि गाणी आजही तितकेच लोकप्रिय आहेत. प्रेक्षकांना त्यांचे विनोद आजही ताजे वाटतात आणि त्यांच्यावर खूप प्रेम करतात.






28 जुलैपासून दर रविवारी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता दादा कोंडके यांचे सदाबहार चित्रपट झी टॉकीजवर प्रसारित होणार आहेत. "पांडू हवालदार", "आंधळा  मारतो डोळा", "एकटा जीव" आणि "सोंगाड्या" या चित्रपटांनी तिकिटबारीवर कमाल केली होती. आता, हेच चित्रपट रंगीत रुपात प्रेक्षकांना पाहता येणार आहे.