Rohit Sharma meet Hasyajatra actors: महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील हास्यवीरांनी आपल्या विनोदी शैलीने संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात घर केलं आहे. एरवी हास्यजत्रेच्या शिलेदारांसोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांची कायम गर्दी होत असते. पण आता हास्य जत्रेच्या विनोदवीरांना भेटण्यासाठी चक्क क्रिकेटर रोहित शर्मा आला होता. त्यामुळे हास्यजत्रेच्या विनोदवीरांना फॅन मोमेंट अनुभवता आली. थेट तुमच्या घरातून' नाटकातील कलाकारांना भेटण्यासाठी तो आला होता. सगळ्या कलाकारांशी मनमोकळेपणाने बोलला. सगळ्या कलाकारांशी मराठीत बोलल्यामुळे कलाकारही थोडे भारावलेले होते. एकूणच हास्यजत्रेच्या कलाकारांसाठी रोहितची भेट अविस्मरणीय ठरली. हास्यजत्रेचे कलाकार आणि रोहित शर्माची भेट याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरतोय. काय बोलणं झालं कलाकारांमध्ये? पाहूया...

रोहित शर्मा भेटला हास्यजत्रेतील शिलेदारांना

महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांना अलीकडेच भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा याची खास भेट घेण्याची संधी मिळाली. या भेटीत नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत, प्रथमेश शिवलकर यांच्यासोबत अभिनेत्री भक्ती देसाई आणि भाग्यश्री मिलिंदही उपस्थित होत्या. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अजय देसाई, किशोर लाड आणि वर्षा हडकर यांच्या पुढाकाराने हा योग जुळून आला. विशेष म्हणजे रोहितने कलाकारांशी मराठीत संवाद साधत सर्वांना सुखद धक्का दिला.

मराठीत रंगल्या गप्पा

या भेटीतील आनंदी क्षणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. भक्ती देसाई आणि नम्रता संभेराव यांनी शेअर केलेल्या क्लिप्समध्ये रोहितला भेटण्यापूर्वीची उत्सुकता आणि त्याला पाहताच बदललेला माहोल स्पष्ट दिसतो. अमराठी असूनही रोहितने सहज मराठीत संवाद साधल्याने उपस्थित कलाकार भारावून गेले. या भेटीचा एक व्हिडिओ कलाकारांनी शेअर केला आहे. 

 

हलकाफुलका संवाद ठरला चर्चेचा विषय

भेटीदरम्यान नम्रता संभेराव यांनी रोहितची विचारपूस केली असता त्यानेही हसत मराठीत उत्तर दिले. “मी मुंबईत राहतो, त्यामुळे मराठी येणारच,” असे तो म्हणाला. या साध्या पण मन जिंकणाऱ्या उत्तराने सगळ्यांनीच त्याचे कौतुक केले. यानंतर कलाकारांनी रोहितसोबत फोटोसेशन केले. हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून चाहत्यांकडून त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.