coolie box office collection day 4 : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित झालेल्या रजनीकांत यांच्या ‘कुली’ या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. विशेष कुलीसोबतच वॉर 2 हा सिनेमा देखील प्रदर्शित झालाय. मात्र, कमाईच्या बाबतीत रजनीकांतच्या कुलीने वॉर 2 ला मागं टाकलंय. कुली सिनेमाने पहिल्याच आठवड्यात बजेटची 90 टक्के रक्कम वसून केली आहे. 14 ऑगस्टला रिलीज झालेल्या या चित्रपटाने फक्त दोन दिवसांत 100 कोटींचा टप्पा गाठला होता.

पहिला विकेंड संपेपर्यंत ‘कुली’ सिनेमाची कमाई 200 कोटींच्या जवळ पोहोचली. आमिर खान, नागार्जुन आणि उपेंद्र यांसारख्या वेगवेगळ्या फिल्म इंडस्ट्रीतील स्टार्सच्या महत्त्वाच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाल केली आहे? ते पाहूया.

‘कुली’चा बॉक्स ऑफिस कलेक्शन

रजनीकांत यांच्या या अॅक्शन चित्रपटाने पहिल्याच दिवशी 65 कोटींची कमाई केली. कुली सिनेमा 2025 या वर्षातील सर्वात मोठी ओपनिंग घेणारा भारतीय चित्रपट ठरला. दुसऱ्या दिवशी कलेक्शन 54.75 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 39.5 कोटी रुपये इतके होते. चौथ्या दिवशी म्हणजे आज रात्री 8:10 वाजेपर्यंत चित्रपटाने 26.73 कोटींची भर टाकली असून एकूण कलेक्शन 185.98 कोटी रुपये झाले आहे. दरम्यान कमाईचे हे आकडे अंतिम नाहीत, त्यात बदल होऊ शकतो.

वर्ल्डवाइड कलेक्शनमधून ‘कुली’ने बजेटचा मोठा हिस्सा वसूल केला आहे. फिल्मफेअरनुसार, ‘कुली’ 375 कोटी रुपयांत तयार करण्यात आली आहे. लोकेश कनगराज यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला हा चित्रपट, सॅक्निल्कच्या आकडेवारीनुसार, फक्त 3 दिवसांत वर्ल्डवाइड 320 कोटींची कमाई करून बसला आहे. यात आजचा देशांतर्गत कलेक्शन मिळवले, तर चित्रपटाने आपला सुमारे 90% खर्च वसूल केला आहे. म्हणजे आता पुढील कमाई ही थेट चित्रपटाला हिटकडे नेणारी ठरणार आहे.

रजनीकांत यांच्या कारकिर्दीतील तिसरी सर्वाधिक कमाई करणारी फिल्म

IMDBच्या अहवालानुसार, रजनीकांत यांच्या ‘2.0’ ने 675 कोटी आणि ‘जेलर’ने 605 कोटी रुपयांची वर्ल्डवाइड कमाई केली होती. त्यानंतर 320 कोटी वसूल करणारी ‘कुली’ ही रजनीकांत यांची तिसरी सर्वाधिक कमाई करणारी फिल्म ठरली आहे.

रजनीकांतच्या सिनेमांची कमाई

कबाली – 295 कोटी

रोबोट – 290 कोटी

वेट्टैयन – 255.8 कोटी

पेट्टा – 223 कोटी

दरबार – 219 कोटी

अन्नाथे – 156 कोटी

शिवाजी द बॉस – 153 कोटी

लिंगा – 152 कोटी

पहिल्या विकेंडमध्ये ‘कुली’ने ‘वॉर 2’ वर केली मात

एका बाजूला ऋतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआरचे स्टार पॉवर, तर दुसऱ्या बाजूला आमिर खान आणि रजनीकांत यांचे स्टारडम. दोन्ही चित्रपट एकमेकांना टक्कर देत होते. पण पहिल्या विकेंडमध्ये ‘कुली’ने ‘वॉर 2’ ला मागे टाकले. ‘वॉर 2’ ने 3 दिवसांत वर्ल्डवाइड 215 कोटी कमावले, तर ‘कुली’ने 320 कोटींची कमाई करून त्याला मात दिली. देशांतर्गत कलेक्शनमध्येही ‘वॉर 2’ 158 कोटींच्या आसपास आहे, तर ‘कुली’ 175 कोटींच्या पुढे गेली आहे.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितच्या अश्रूंचा बांध फुटला, जन्मदात्रीला दिला मुखाग्नी

'अलका कुबल विमानतळावर भेटल्या अन् म्हणाल्या तुला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर..', गौतमी पाटीलने सांगितला किस्सा