Comedian Bharti Singh Welcomes Second Baby Boy: कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. 19 डिसेंबर रोजी भारतीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. हे जोडपं दुसर्यांदा पालक बनले आहे. सध्या भारतीचा आई झाल्यानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. बाळंतपणापासून भारती रूग्णालयातच व्लॉगिंग करत होती. तिनं नुकताच व्लॉग तयार केला आहे. या व्लॉगमध्ये तिनं बाळासोबत घालवले क्षण शेअर केले आहे. तिला पहिला मुलगा झाला होता. तिला दुसर्यांदाही मुलगा झाला आहे. तिनं मुलीची अपेक्षा व्यक्त केली होती. पण तिनं १९ डिसेंबर रोजी दुसर्या मुलाला जन्म दिला. भारतीनं व्लॉगमधून आपला अनुभव शेअर केला आहे.
भारतीने 19 डिसेंबर रोजी बाळाला जन्म दिला. बाळाचा जन्म झाल्यानंतर भारतीनं मुलाला काजू म्हणून हाक मारली. तिनं व्लॉगमध्ये सांगितलं की, "काजूला नियमित तपासणीसाठी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. 2 दिवस काजू माझ्याजवळ नव्हता", असं भारती म्हणाली. तिने काजूला हातावर घेतलेला फोटो शेअर केला आहे. भारतीने नुकतेच एक व्लॉग तयार केले आहे. या व्लॉगमध्ये तिनं लहान बाळाला हातात घेतले होते. भारतीने जेव्हा बाळाला हातात घेतले, तेव्हा ती भावुक झाली होती.
व्लॉगच्या सुरुवातीला भारती आपल्या बाळाला भेटण्यासाठी आतुर झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. जेव्हा काजूला भारतीच्या हातात देण्यात आले, तेव्हा ती प्रचंड भावनिक झाली. नर्स काजूला घेऊन भारतीकडे जाते. काजूला पाहून भारतीचा आनंद गगनात मावेनासा होतो. भारतीचे मातृत्व जागे झाल्याने ती प्रचंड भावनिक होते. व्लॉगमध्ये भारती म्हणते, "फायनली माझा बेबी मला मिळाला आहे. तो खूप गोंडस आहे मित्रांनो. गोला आणि हर्ष नुकतेच घरी गेले. जर तो थोडा लवकर आला असता तर, दोघेही काजूला भेटू शकले असते", असं भारती म्हणाली.
काजूला आपल्या हातावर घेत भारती त्याचे चुंबन घेते आणि म्हणते, "काजू खूप सुंदर, गोड आणि निरोगी बाळ आहे. अगदीच बॉलप्रमाणे गोल आहे. लवकरच आम्ही तुम्हाला काजू दाखवू. गणपती बाप्पा मोरया.. तो कायम आनंदी आणि नेहमी निरोगी राहो..". सध्या भारतीचा हा व्लॉग सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी देखील भारतीचं अभिनंदन केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारती सिंह सध्या लाफ्टर शेफ्स ३ मधून ब्रेक घेत आहे. ती गेल्या आठवड्याच्या भागात दिसली होती. ती काही भागांसाठी शो पासून दूर राहणार आहे.