Colors Marathi Serial: कलर्स मराठीवरील ‘मी जिंकून घेईन सारं’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय.लग्नात छवीमुळे घडलेल्या प्रसंगानंतर वत्सला घर सोडण्याचा निर्णय घेते, तर दुसरीकडे शांभवी आणि छवी यांच्यातील नातं एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपलं आहे. घरात सुरू असलेल्या या गोंधळात आता प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे छवी आणि अनिकेतच्या बदलत्या नात्याने. सततची भांडणं, टोमणे आणि नोकझोक यामधून सुरू झालेलं हे नातं आता हळूहळू एका वेगळ्याच वळणावर जाताना दिसतं आहे...छवीची भूमिका साकारणारी जान्हवी आणि अनिकेतची भूमिका साकारणारा संचित यांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीचीही चर्चा रंगलीय.  सेटवरील मजेशीर किस्से शेअर केले आहेत.

Continues below advertisement

छवी-अनिकेतची ऑफ स्क्रीन भट्टी जमली

याच बदलत्या केमिस्ट्रीविषयी बोलताना छवी अर्थात जान्हवी आणि अनिकेत अर्थात संचित यांनी सेटवरील त्यांची भन्नाट मैत्री आणि मजेशीर धमाल शेअर केली. जान्हवी म्हणाली, “छवीच्या मागे छान जान्हवी दडलेली आहे. जान्हवी आणि छवी खूपच वेगळ्या आहेत. जसे crackhead & फिरंग्या आहेत तसेच जान्हवी आणि संचित देखील आहेत. आम्हांला हे सांगायला आवडेल आमची मैत्री ऑफ स्क्रीन कमाल आहे, आणि कुठेतरी तेच तुम्हांला दिसून देखील येत आहे मालिकेत. जसे आम्ही व स्क्रीन भांडतो तसे आम्ही रिअल मध्ये भांडायचो. आम्हला आता इतकी सवय झाली आहे टॉम & जेरी सारखे भांडायची कि आम्ही ऑफ स्क्रीन देखील तसेच राहतो. सेटवरच मस्तीखोर माणूस कोणी असेल तर तो संचित आहे. संचित आणि अमित मेकरूममध्ये music लावतात जेव्हा सिनमध्ये वेळ असतो आम्ही नाचतो वैगरे सेटवर आम्ही भयंकर धम्माल मस्ती करतो.

आंब्यावर ताव मारला

तिनं पुढे आंब्यांच्या सीझनमधील एक खास किस्साही सांगितला,"सध्या आंब्यांचा सिझन आहे आणि फळांचा राजा हापूस आंबा हा आपल्या सगळ्यांचा आवडता आहे. मी स्वतः कोकणातली आहे, मी आंबे जेवते. सेटवर आमच्या आंबे रोज येतात. संचित म्हणाला आंब्यावरून आठवलं, आता मालिकेत छवी आणि अनिकेतची नोकझोक कमी दिसणार आहे. मालिकेला नवे वळण मिळणार आहे. आम्ही नुकतंच एक sequence शूट केला ज्यात आम्ही आमरस बनवला आहे. पण तो बनवताना ऑफ स्क्रीन छवी आणि अनिकेतची भट्टी जमली. मला आणि जान्हवीला आंबा प्रिय आहे, आम्ही वेडे आहोत. आम्ही सेटवर आलेल्या आंब्यावर ताव मारला ... तो sequencr शूट होत असताना आम्ही जवळपास १५ - २० आंबे खाल्ले आणि आमरस प्यायलो. धम्माल आली आहे.”

Continues below advertisement