सर्वकाही गुपचूप सुरु असताना कॅमेरा फिरला अन् कॉन्सर्टमध्ये CEO चं अफेअर उघडं पडलं, आता पहिली प्रतिक्रिया समोर
Coldplay Concert couple Viral Video : सर्वकाही गुपचूप सुरु असताना कॅमेरा फिरला अन् कॉन्सर्टमध्ये CEO चं अफेअर उघडं पडलं, आता पहिली प्रतिक्रिया समोर

Coldplay Concert couple Viral Video : प्रसिद्ध हॉलीवूड रॉक बँड कोल्डप्लेच्या बॉस्टनमधील कॉन्सर्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. इंटरनेटवर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका कंपनीच्या सीईओचं अफेअर उघडकीस आला आहे.घटनेनुसार, एस्ट्रोनॉमर कंपनीचे सीईओ अँडी बायरन हे आपल्या सहकारी क्रिस्टिन कॅबोटसोबत बॉस्टनमधील कोल्डप्ले कॉन्सर्टला गेले होते. या व्हिडिओमध्ये दोघे गुपचूप एकमेकांना मिठी मारताना दिसतात. मात्र, त्यानंतर त्यांच्यावर कॅमेरा फिरतो आणि अफेअर समोर येतं. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालांय. लोक या व्हिडीओवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.
एस्ट्रोनॉमर या कंपनीचे सीईओ अँडी बायरन यांनी कोल्डप्ले कॉन्सर्टमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्पष्टीकरण दिले आहे. या व्हिडिओमुळे बायरन आणि कंपनीच्या चीफ पीपल ऑफिसर क्रिस्टिन कॅबॉट यांच्यावर टीका होऊ लागली आणि दोघांबद्दल अफवा पसरू लागल्या. कारण, कॉन्सर्टदरम्यान 'किस कॅम' त्यांच्यावर वळली असता, दोघे एकमेकांना मिठी मारताना दिसले होते.
Cold Play के कंसर्ट में एक बड़े CEO का चुपचाप वाला अफेयर कैमरामैन ने एक्सपोज कर दिया😂😂
— Jaiky Yadav (@JaikyYadav16) July 17, 2025
pic.twitter.com/6kzkYy1WUG
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बायरन यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले. त्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारली आणि गोपनीयतेची विनंती केली. त्यांचे हे निवेदन सध्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, "संगीत आणि आनंदाची असलेली एक रात्र वैयक्तिक पातळीवरील चूक ठरली, जी एकदम सार्वजनिक व्यासपीठावर समोर आली."
कोण आहेत अँडी बायरन?
कॉन्सर्टदरम्यान दोघांना मोठ्या स्क्रीनवर एकमेकांच्या मिठीत दाखवण्यात आले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एस्ट्रोनॉमर कंपनीच्या वर्क एथिक्स (कामाच्या नैतिकते)वर प्रश्न उपस्थित केले गेले आणि ही घटना चर्चेचा विषय बनली.एस्ट्रोनॉमरबद्दल माहिती नसलेल्यांना सांगायचं झालं, तर ही एक अशी कंपनी आहे जी इतर संस्थांना मोठ्या प्रमाणात डेटा पाइपलाइन तयार करणे, चालवणे आणि देखरेख करण्यासाठी क्लाउड प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते. त्यांचा मुख्य प्रॉडक्ट म्हणजे "एस्ट्रो", जो एक क्लाउड-बेस्ड प्लॅटफॉर्म आहे.
लोकांची प्रतिक्रिया
टेलीचक्कर या साइटवर हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर लोकांनी आपली मतं मांडली आहेत. एका युजरने लिहिले, “दोघंही विवाहित आहेत आणि त्यांचं अफेअर सुरू आहे. त्यामुळे त्यांचा भांडाफोड होणं योग्यच आहे आणि आता हे सगळं इंटरनेटवर पसरलं आहे.” काही युजर्सनी तर इंस्टाग्रामवर फनी इमोजीही शेअर केल्या आहेत.
कोल्डप्ले आणि मार्टिनची प्रतिक्रिया
कोल्डप्ले बँडमध्ये क्रिस मार्टिन, गाय बेरीमॅन, जॉनी बकलंड आणि विल चॅम्पियन यांचा समावेश आहे. कॉन्सर्टदरम्यान कॅमेरा जेव्हा प्रेक्षकांवर फिरवण्यात आला, तेव्हा क्रिस मार्टिन यांनी त्या दोघांकडे पाहत जोरात ओरडत म्हटले, "अरे, या दोघांकडे बघा! अरे काय हे?" कॅमेऱ्यावर आल्यावर दोघेही आपले चेहरे लपवू लागतात. हे पाहून मार्टिन गंमतीने म्हणतात, "एक तर यांचं अफेअर सुरू आहे, नाहीतर हे फारच लाजाळू असावेत."























