Cocktail 2: बॉलिवूडमधील बहुचर्चित कॉकटेल 2 या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढत चालली आहे. नुकताच या चित्रपटातील शहीद कपूर , रश्मिका मंदाना  आणि कृती सेनन यांचा फर्स्ट लूक समोर आला असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पोस्टरमध्ये तिघेही कारने बीच ट्रिपला जाताना दिसत आहेत, त्यामुळे चित्रपटाचा मूड मस्तीपूर्ण असल्याचं दिसत आहे. हा चित्रपट दिग्दर्शक होमी अदाजनिया दिग्दर्शित करत आहेत. फर्स्ट लूकसोबतच चित्रपटाच्या टीझरबाबतही मोठी माहिती समोर आली आहे. (Cocktail2 Poster OUT)

फर्स्ट लूक पाहिलात?

चित्रपटातून समोर आलेल्या पोस्टरमध्ये रश्मिका मंदाना व्हाइट ड्रेस आणि सनग्लासेसमध्ये कारमधून व्हिडिओ शूट करताना दिसते. दुसरीकडे शाहिद कपूर रंगीबेरंगी शर्टमध्ये दिसत असून त्यांच्या मागे मावळता सूर्य दिसतो. तर कृति सेननच्या पोस्टरमध्ये तिचे पाय दिसत असून त्यावर ‘Catch the sea’ असा टॅटू दिसत आहे.

हे पोस्टर शेअर करताना तिन्ही कलाकारांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, चित्रपटाबद्दल आणखी माहिती जाणून घेण्यासाठी 18 मार्चला थिएटरमध्ये जरूर या. त्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे.

‘धुरंधर: द रिवेंज’सोबत रिलीज होणार टीझर

दिग्दर्शक होमी अडजानिया यांनीही पोस्टर शेअर करत सांगितलं की ‘कॉकटेल 2’चा टीझर प्रेक्षकांना फक्त सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. हा टीझर 18 मार्चला दिग्दर्शक आदित्य धरच्याधुरंधर: द रिवेंज या चित्रपटासोबत दाखवण्यात येणार आहे.

2012 च्या हिट चित्रपटाचा सीक्वल

कॉकटेल या 2012 मध्ये आलेल्या हिट चित्रपटाचा हा सीक्वल आहे. पहिल्या भागात  सैफ अली खान, दीपिका पदुकोन आणि डायना पेंटी मुख्य भूमिकेत होते आणि चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता दुसऱ्या भागात नवी स्टारकास्ट आणि नव्या कथेसह कथा पुढे नेण्यात येणार आहे. काही रिपोर्ट्सनुसार या चित्रपटात शाहिद, रश्मिका आणि कृति यांच्यात लव्ह ट्रायँगल पाहायला मिळू शकतो. हा चित्रपट 19 जून रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.