Trisha Krishnan Gets 12 Crore Offer From Opposition Party: तामिळनाडूच्या राजकारणात (Tamil Nadu Politics) एकीकडे नवनिर्वाचित मुख्यमंत्री थलपती विजय (CM Thalapathy Vijay) आणि दुसरीकडे प्रसिद्ध अभिनेत्री तृषा कृष्णन (Famous Actress Trisha Krishnan) हिची चर्चा रंगली आहे. थलपती विजय (Thalapathy Vijay) यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगलेल्या असतानाच त्यांच्या पत्नीनं त्यांच्यावर अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप लावले. याबाबत चर्चा सुरू असतानाच अनेकदा थलपती विजय आणि तृषा कृष्णन (Trisha Krishnan) एकत्र दिसून आले आणि दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. अशातच थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यात पारंपरिक लूकमध्ये मिरवणाऱ्या तृषा कृष्णननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तेव्हापासूनच ती चर्चेत आहे. अशातच आता एक बातमी समोर आली आहे. जिनं तमिळ सिनेसृष्टीत मोठी खळबळ उडवून दिलीय. थलपती विजयचे राजकीय प्रतिस्पर्धी उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी तृषा कृष्णन हिला 12 कोटी रुपयांची भरघोस ऑफर दिल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे जोरदार चर्चांना उधाण आलंय.  

Continues below advertisement

मीडिया रिपोर्टनुसार, द्रमुकचे (DMK) एक प्रमुख नेते आणि थलपती विजय यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या उदयनिधी स्टॅलिन यांनी एका मोठ्या सिनेमाच्या प्रोजेक्टसाठी तृषा कृष्णनला 12 कोटी रुपयांची रक्कम देऊ केली आहे. या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेसाठी तृषाचा विचार केला जात असल्याचं सांगितलंय.

तृषाच्या मानधनात मोठी वाढ (Udhayanidhi Stalin Offer Trisha Krishnan)

तृषा कृष्णन हिच्या मानधनात अलिकडेच मोठी वाढ झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ती आता प्रत्येक सिनेमासाठी 10 ते 12 कोटी इतरं मानधन आकारते. थलपती विजयसोबतची तिची जोडी, तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आणि 'पोनियिन सेल्वन'सारख्या मोठ्या सिनेमांमधलं तिचं अलीकडील काम, यामुळे तेलगू फिल्म इंडस्ट्रीतील तिची लोकप्रियता फारच वाढली आहे. 

Continues below advertisement

उधयनिधी स्टॅलिन यांची मोठी ऑफर (Udhayanidhi Stalin Trisha Krishnan)

उधयनिधी स्टॅलिन यांची मोठी ऑफर अनेक कारणांमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. उधयनिधी स्टालिन हे 'डीएमके' (DMK) पक्षाचे एक प्रमुख नेते आहेत. आणि हा पक्ष थलपती विजयच्या 'टीव्हीके' (TVK) पक्षाचा कट्टर प्रतिस्पर्धी आहे. याशिवाय, तृषा आणि थलपती विजय यांच्यात नात्याबाबतही सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. अशातच थलपती विजयच्या कट्टर राजकीय प्रतिस्पर्ध्यानं आता तृषा कृष्णन हिला एका मोठ्या फिल्मच्या प्रोजेक्टसाठी विचारल्यामुळे ही बाब सध्या जनतेमध्ये चर्चेचा विषय ठरतेय. 

तृषा कृष्णन हिनं ऑफर स्विकारली? 

सध्या तरी, तृषा ही ऑफर स्वीकारणार की नाकारणार, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तरीही, तमिळ सिनेसृष्टीतील प्रत्येकाच्या मनात सध्या हाच प्रश्न प्रामुख्यानं घोळत आहे. जर तिनं या प्रस्तावाला होकार दिला, तर तो केवळ तिच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पाच ठरणार नाही, तर त्यामुळे अनेक लक्षणीय बदलांची मालिकाही सुरू होऊ शकते.

तृषा कृष्णन हिनं अलिकडच्या काळात तमिळ सिनेसृष्टीत अत्यंत दमदार कामगिरी केली आहे. 'पोनियिन सेल्वन', 'घिल्ली' आणि 'वर्षम' यांसारख्या सिनेमांमध्ये तिनं अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. 2023 मधील 'लिओ' सिनेमात विजयसोबत केलेल्या तिच्या पुनरागमनामुळे ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. विजयच्या शपथविधी सोहळ्यातील तिच्या उपस्थितीमुळे तिच्या लोकप्रियतेत मोठी भर पडली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Trisha Krishnan Aishwarya Rai 26 Year Old Look: तृषा कृष्णनकडून थलपती विजय यांच्या शपथविधीसाठी ऐश्वर्या रायचा 26 वर्षांपूर्वीचा 'तो' लूक कॉपी?