CM Devendra Fadnavis On Pranit More Stand Up Comedian Row: प्रणित मोरेच्या (Pranit More) शोमधले '370 रुपयांची बिर्याणी' (370 Rupees Biryani) आणि डॉक्टर तरुणीचं मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्ट्सबाबतचं अश्लील वक्तव्य सोशल मीडियावर जोरदार व्हायरलं झालं आणि मोठा गदारोळ झाला. यावरुन संतापाची लाट उसळली असून जोरदार ट्रोलिंग केलं जातंय. अशातच आता याप्रकरणी प्रणित मोरे, बिर्याणीचं वक्तव्य करणारा हिंमांशु जांगडा (Himanshu Jangra) आणि मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्ट्सवर बोलणारी डॉक्टर सेजल पवार (Sejal Pawar) यांच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे. अशातच आता या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Continues below advertisement

प्रत्येकाला अभिव्यक्तीचा अधिकार आहे, स्टँडअप कॉमेडियनलाही आहे, पण ते होत असताना मर्यादा काय आहेत? यादेखील आपण पाळल्या पाहिजेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. समाजातल्या इतर लोकांच्या प्रतिष्ठेनं जगण्याच्या स्वातंत्र्यावर कुणीच अतिक्रमण करू नये, अशी माझी अपेक्षा आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? (CM Devendra Fadnavis On Pranit More Show)

Continues below advertisement

स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमधल्या व्हायरल होत असलेल्या दोन आक्षेपार्ह्य व्हिडीओ क्लिप्सवरुन सुरू असलेल्या गोंधळावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अभिव्यक्तीचा अधिकार हा प्रत्येक व्यक्तीला भारताच्या संविधानानं दिलाय, पण त्याचवेळी अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे स्वैराचारामध्ये बदलू नये, अशा प्रकारची अपेक्षाही भारताच्या संविधानानं व्यक्त केली आहे. ज्यावेळी सामाजिक मर्यादा मोडून, आपण अभिव्यक्ती करतो, त्यावेळी इतरांचं स्वातंत्र्य जे इतरांना प्रतिष्ठेनं राहण्याचं स्वातंत्र्य हे संविधानानं दिलेलं आहे, त्या स्वातंत्र्यावर आपण अतिक्रमण करतो, म्हणूनच मला असं वाटतं की, प्रत्येकाला अभिव्यक्तीचा अधिकार आहे, स्टँडअप कॉमेडियनलाही आहे, मी स्वतःही स्टँडअप कॉमेडी मोठ्या प्रमाणावर पाहतो... हे मनोरंजनाचं साधन आहे, पण ते होत असताना मर्यादा काय आहेत? यादेखील आपण पाळल्या पाहिजेत, समाजातल्या इतर लोकांच्या प्रतिष्ठेनं जगण्याच्या स्वातंत्र्यावर कुणीच अतिक्रमण करू नये, अशी माझी अपेक्षा आहे..."

प्रणित मोरेच्या शोमधील वादग्रस्त कंटेटप्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलची कारवाई

प्रणित मोरेच्या कार्यक्रमावरील वादग्रस्त कंटेटप्रकरणी महाराष्ट्र सायबरने कारवाई केली आहे. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कथित आक्षेपार्ह वक्तव्य सोशल मीडिया आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रसारित केल्याप्रकरणी प्रमित मोरे, हिमांशू आणि सेजल पवार यांच्यासह इंतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित झालेल्या काही व्हिडिओ क्लिप्समध्ये महिलांविषयी अवमानकारक वक्तव्य आढळल्याचा दावा महाराष्ट्र सायबरनं केलाय. याप्रकरणात प्रणित मोरे, हिमांशू जंगरा आणि डॉ. सेजल पवार यांना चौकशीसाठी आणि जबाब नोंदविण्यासाठी समन्स बजावण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ : CM Fadnavis On Pranit More:अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्वैराचारात बदलू नये, प्रणित मोरेवर प्रतिक्रिया

महत्त्वाच्या इतर बातम्या :

KEM Hospital Dean On Sejal Pawar Viral Video: प्रणित मोरेच्या शोमध्ये डॉ. सेजल पवार नको ते बोलली, KEM रुग्णालयाकडून महत्त्वाचं पाऊल, डीन म्हणाले, तो Viral Video...

ABP Majha च्या बातम्या LIVE :