Actress Purva Kaushik Emotional On CJP Protest: नीट पेपरफुटी प्रकरणावर (NEET Paper Leak Case) केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Minister Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीचं (Cockroach Janata Party) राजधानी दिल्ली (Delhi News) येथील जंतर-मंतरवर आंदोलन (Jantar Mantar Protest) सुरू आहे. 20 जुलैला कॉकरोच जनता पार्टीकडून (CJP) थेट दिल्लीतील संसद भवनावर धडक मोर्चाचं आवाहन करण्यात आलेलं. या आंदोलनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेकजण दिल्लीत दाखल झालेले. तर काही सेलिब्रिटीही आंदोलनात सहभागी झालेले. या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी काहींना ताब्यात घेतलं, तर काही आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला. याचे काळजात धडकी भरवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले. या आंदोलनानंतर अनेक सेलिब्रिटी विद्यार्थ्यांना पाठींबा देण्यासाठी मैदानात उतरले. तर, काहींनी सोशल मीडियावर व्यक्त होऊन आपला पाठींबा दर्शवला. अशातच एका मराठी अभिनेत्रीनं (Marathi Actress) सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली. 

Continues below advertisement

मराठी अभिनेत्री पूर्वा कौशिक (Marathi Actress Purva Kaushik) हिनं एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये दिल्लीतील जंतर-मंतरवरच्या आंदोलनाला तिनं पाठींबा दर्शवला आहे. तसेच, आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा तिनं निषेध केला आहे. तसेच, व्हिडीओमध्ये तिला अश्रू अनावर झाले असून तिनं आपली हतबलताही व्यक्त केली आहे. 

मराठमोळी अभिनेत्री पूर्वा कौशिक नेमकं काय म्हणाली? (Purva Kaushik On Delhi Student Protest)

Continues below advertisement

मराठी अभिनेत्री पूर्वा कौशिक हिनं तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती इमोशनल झाली असून ती म्हणाली की, "मला कधीच वाटलं नव्हतं की मी असा काहीतरी व्हिडीओ करेन. मी या धाटणीची मुलगी नाहीये. काही गोष्टी सहन होत नाहीयेत. खूप हेल्पलेस फिल होतंय. आपण काहीच करू शकत नाही... माणसं मरतायत... काहीही चाललंय. पण, लोकशाही असलेल्या देशात चाललंय. आताही माझा हा व्हिडीओ बघून काही जण बोलतील की, रडायला एवढं काय झालं? एवढा काय दिखावा करतेय तेच होणार. पण तेच हे कोणाशी बोलायचं", असं तिने म्हटलं आहे.

व्हिडीओमध्ये पुढे बोलताना पूर्वा कौशिक म्हणाली की, "इन्स्टाग्रामवर किती सपोर्ट दाखवायचा? काय करायचं? काहीच कळत नाहीये. आपण काय करतो, दोन वेळचं जेवतो आणि झोपतो. पण, आपल्यासाठीच काही लोक लढत्यात. त्यांचं काय होतंय... आपण काय पद्धतीने मदत करू शकतो. काय करू शकतो? माहीत नाही. हे जे काही चाललंय ते लवकरात लवकर थांबवा. माणसाची किंमत इतकी कमी आहे, हे माहीत नव्हतं. जबाबदारीची जाण शून्य आहे..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Naseeruddin Shah On Violence With Students: 'सरकारला फक्त एकच सांगणं, सगळं लक्षात ठेवलं जाईल...'; जंतर-मंतरवर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, नसीरुद्दीन शाहांचा संताप