Chowk Movie Trailer Out : 'चौक' (Chowk) हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अल्पावधीतच या ट्रेलरला 2,61,303 व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर हा ट्रेलर व्हायरल होत आहे. 


प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात, प्रत्येक गल्लीत असतो आपला एक चौक! आपल्या चौकात असतात, जिवाभावाची आपली माणसं... अशाच जिवाभावाच्या, दोस्तीच्या दुनियेवर भाष्य करणारा 'चौक' हा सिनेमा आहे. या सिनेमाची चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. 


'चौक' या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस, लोकांच्या गळ्यातील ताईत, तुम्हाला आम्ही मार्केटमध्ये आणू शकतो तर मार्केटमधून घालवू पण शकतो, मार्केटमध्ये राहायचं असेल तर एवढं सहन करावं लागेल, असे दमदार डायलॉग या सिनेमात आहेत. 


'या' दिवशी चौक होणार प्रदर्शित! (Chowk Movie Release Date)


एप्रिल-मे मध्ये शाळांना सुट्या असल्याने अनेक मराठी सिनेमे या महिन्यांत प्रदर्शित होत आहेत. 5 मे ला प्रदर्शित होणारा 'बलोच' आणि 12 मे ला प्रदर्शित होणारा 'रावरंभा' या चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळावा आणि मराठी चित्रपटांची आपापसात स्पर्धा होऊ नये यासाठी बहुचर्चित चौक या चित्रपटाने एक कौतुकास्पद पाऊल उचललं आहे. चौक चित्रपटाने आपल्या प्रदर्शनाची 12 मे ही तारीख एक आठवडा पुढे घेतली आहे. आता हा चित्रपट 19 मे रोजी प्रदर्शित होईल.


सर्व मराठी चित्रपटांना प्रेक्षकवर्ग मिळावा यासाठी रिलीज डेट ढकलली पुढे 


मराठी सिनेमांमधील स्पर्धा टळावी यासाठी 'चौक' या सिनेमाने आपल्या प्रदर्शनाची तारीख पुढे घेत मराठी चित्रपटसृष्टीत एक उत्तम आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. सर्व मराठी चित्रपटांना प्रेक्षकवर्ग मिळावा यासाठी उचललं हे विधायक पाऊल आहे. यासंदर्भात दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड म्हणाले की,"आमच्याच मित्रांचे बलोच आणि रावरंभा हे चित्रपट मे मध्ये प्रदर्शित होत आहेत. या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी चौक चित्रपटाची 12 मे ही तारीख बदलून आता 19 मे करण्यात आली आहे". 


प्रविण तरडे म्हणाले की,"इतर चित्रपटांचा विचार करून, आमचा मित्र दयाने त्याचा 'चौक' हा चित्रपट एक आठवडा पुढे घेत एक अभिमानास्पद पाऊल उचललं आहे. त्याबद्दल त्याचं अभिनंदन!’


पाहा ट्रेलर



संबंधित बातम्या


Baloch Trailer Launch: 'बलोच' चा भव्य ट्रेलर लाँच सोहळा संपन्न; चित्रपटात प्रवीण तरडे, स्मिता गोंदकर प्रमुख भूमिकेत