Continues below advertisement

Chitrangda Singh Opens Up About On-Set Experience:चित्रांगदा आणि सलमान खान ही जोडी पहिल्यांदाच रूपरी पडद्यातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'बॅटल ऑफ गलवान' या चित्रपटात चित्रांगदा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिनं अलिकडेच एका मुलाखतीतून सलमान खानसोबतस्क्रीनशेअरकरतानाचा अनुभव शेअर केला आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत तिनंचित्रपटादरम्यानचाकिस्साशेअर केला आहे. यात तिनं सलमान खान किती दिलदार व्यक्तिमत्व आहे, याबाबत माहिती दिली. तिचा सलमान खानसोबत काम करतानाचा अनुभव कसा होता? जाणून घेऊयात.

मुलाखतीदरम्यान, चित्रांगदा म्हणाली, "नक्कीच या चित्रपटासाठी मी खूप उत्साही आहे. मी कधीच कल्पना केली नव्हती की मी त्यांच्यासोबत काम करेन. मी आतापर्यंत जी व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याहून ही व्यक्तिरेखा खूप वेगळी आहे. म्हणून मी कधीच कल्पना केली नव्हती की मी कधी त्यांच्यासोबतस्क्रीनशेअर करेन. त्यांच्यासोबत काम करणं ही पर्वणीच म्हणेन", असं चित्रांगदा म्हणाली.

सेटवरील वातावरणाबद्दल बोलताना चित्रांगदा सिंह म्हणाली की, "सलमान खानसोबत काम करणे अवघड नव्हते. एखादा सीन पूर्ण करत असताना कोणताही दबाव नसतो. सर्व काही शांतेत, एका प्रवाहात सुरू होते. सेटवर प्रत्येकाची काळजी घेतली जाते. प्रत्येकाला वेळेवर स्नॅक्स आणि ब्रेक मिळतो. सेटवरचे वातावरण खूप चांगले असते", असं सलमान म्हणाले. "पणसुपरस्टारसोबतकामकरतअसताना अनेक आव्हने असतात. परंतु, त्यांच्यासोबतकाम करत असताना मलाखूपदबाव जाणवत होता", असं चित्रांगदा म्हणाली.

"चित्रपट सध्या प्रॉडक्शनमध्ये आहे. आमचं अजूनही शुटिंग सुरू आहे. चित्रपट पूर्ण झाला आहे, असं म्हणता येणार नाही. परंतु, आशा आहे हा चित्रपट लवकरच पूर्ण होईल आणा प्रेक्षकांना आवडेल", असं चित्रांगदा म्हणाली.

चित्रपटाच्या घोषणेनंतर चाहत्यांच्या प्रतिक्रियेबद्दल तिनंसांगितलं की, "जेव्हा चित्रपटाची घोषणाझाली, तेव्हापीआरटीमनंमलाप्रतिक्रियांबद्दलसांगितले. सुदैवानेचित्रपटालाचांगलाचप्रसिसादमिळाला. पण अजूनही या चित्रपटाबाबत एक दबाव आहे. बॉलिवूडचासुपरस्टार जर सोबतस्क्रीनशेअरकरत असेल तर, निश्चितच मला स्वत:ला बेस्टद्यायचं होतं", असं चित्रांगदा म्हणाली.

चित्रांगदाने चित्रपटातील एका गाण्याच्या शुटिंगदरम्यान झालेल्या दुखापतीबद्दल माहिती दिली. ती म्हणाली, "रिहर्सलदरम्यानमाझ्या गुडघ्याला दुखापत झाली. मला प्रचंड दुखापत झाली. मला असं वाटलं की कुणीतरी लाथ मारली. मी तिथे विचारले की, कुणी लाथ मारली का? तेव्हा माझ्याACLफाडण्याचा आवाज इतका मोठा होता की, कॅमेरा फिरण्यापूर्वीच हे सगळं घडले", अशी माहिती चित्रांगदाने दिली.

"यानंतर सलमान खानने खूप मदत केली. सलमान खूपदयाळू आणि मदतगार आहेत. त्यांनीमलाव्हॅनमध्येआरामकरण्याससांगितले. कारण माझी व्हॅन दूर होती. त्यांचीव्हॅनजवळच पार्क केली होती. ते कपडे चेंज करण्यासाठी व्हॅनमध्ये गेले नाही. सलमान कपडे बदलण्यासाठी तंबूमध्ये गेले. त्यांनी माझी खरोखर काळजी घेतली", असं चित्रांगदा म्हणाली.