Upcoming Marathi Drama : पुण्याच्या (Pune News) रंगभूमीवरून आलेल्या तरुण कलाकारांच्या उत्साही टीमने पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलंय. गेल्या दोन वर्षांपासून लेखक-दिग्दर्शक विनोद रत्ना आणि त्यांच्या ग्रुपने राज्यभरातील एकांकिका स्पर्धांमध्ये विजय मिळवला. 'ऑल दी बेस्ट', 'मनोमिलन' अशा उदाहरणांनी हे घवघवीत यश या आधीही अधोरेखित झाले आहे. यंदा अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ या एकांकिकेने सर्वच पारितोषिकं पटकावले. लेखन, दिग्दर्शन, अभिनय, बॅकग्राउंड आणि लायटींग या सर्वच घटकांमध्ये काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांनी त्याला साथ दिली.
'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!' एकांकिका ते नाटक पर्यंतचा प्रवास...
या यशानंतर आता हीच एकांकिका नाटकाच्या रूपात व्यावसायिक रंगभूमीवर येत आहे. चंद्रकांत कुलकर्णी यांच्या सादरीकरणाखाली हे नाटक रंगमंचावर उभं राहणार असून विशेष म्हणजे ओरिजिनल एकांकिका टीम या नाटकात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
हे नाटक करण्यामागचा उद्देश नक्की काय?
‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ हे नाटक नव्या पिढीचा विचार, दृष्टीकोन आणि समाजाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन प्रेक्षकांपुढे मांडणार आहे. लेखक-दिग्दर्शक विनोद रत्ना यांच्या लेखणीतून साकारलेली ही कथा नव्या Gen-Z पिढीला रंगमंचावर साकारणार आहे. निर्माते श्रीपाद पद्माकर आणि दिलीप जाधव तसेच सादरकर्ते चंद्रकांत कुलकर्णी यांनी सांगितल्याप्रमाणे, “या नाटकाद्वारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वारसा चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे"
दमदार टीमशी ओळख!
समृद्धी कुलकर्णी, श्रेयस जोशी आणि वैभव रंधवे या कलावंतांच्या अभिनयाची झलक आधीच पुरस्कारमंचावर दिसली आहे. आता व्यावसायिक रंगभूमीवर त्यांचे सादरीकरण पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. बॅकग्राउंड आर्टीस्ट ऋतुजा बोठे, लायटींग अभिप्राय कामठे आणि संगीत ‘कलादर्शन, पुणे’ यांनी सजवलेले हे नाटक नव्या विचारांना आणि तरुण उत्साहाला नवा रंग देणार आहे. ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ या नाटकातून मराठी रंगभूमीला एक ताजं, सळसळतं आणि विचारशील रूप लाभणार आहे. मराठी रंगभूमीदिनाच्या मुहूर्त, म्हणजेच 5 नोव्हेंबर 2025 रोजी ‘जिगीषा’ संस्थेच्या निर्मितीत हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
इतर महत्तवाच्या बातम्या :