China May Bans Hollywood Films: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्काला प्रत्युत्तर म्हणून चीननं हॉलिवूड चित्रपटांवर कारवाई करण्याची योजना आखल्याची माहिती मिळत आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, जर चीननं आपला 34 टक्क्यांचा प्रत्युत्तरात्मक कर मागे घेतला नाही, तर ते चिनी आयातीवर अतिरिक्त 50 टक्क्यांचा कर लादतील. अशा परिस्थितीत चीन आता हॉलिवूड चित्रपटांवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. 

आंतरराष्ट्रीय माध्यमांमधील अनेक वृत्तांनुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कर लादण्याच्या प्रत्युत्तरात चीन आपल्या बाजारपेठेतून हॉलिवूड चित्रपटांवर बंधनं घालू शकतो. डेली मेलच्या वृत्तानुसार, अमेरिकेकडून वाढत्या शुल्काच्या धमक्या चीन कधीही स्वीकारणार नाही. 

अमेरिकन चित्रपटांवर बंदी घालणार 

कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित एका चिनी पत्रकारानं बीबीसीच्या 'रेडिओ 4' कार्यक्रमात सांगितलं की, देश सोयाबीनसारख्या अमेरिकन कृषी निर्यातीवर जास्त शुल्क लादेल, सर्व अमेरिकन पोल्ट्रींना चीनमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालेल आणि अमेरिकन चित्रपटांना देशात प्रवेश करण्यास बंदी घालेल.

2024 मध्ये अमेरिकन चित्रपटांची चीनमध्ये मोठी कमाई 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या धमकीला चीननं 'चुकांवर चुका' म्हटलं आहे आणि त्या थांबण्यासाठी कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, ट्रम्पच्या टॅरिफ धमक्यांना प्रतिसाद देण्यासाठी अधिकारी विचारात घेत असलेल्या उपाययोजनांची यादी दोन प्रभावशाली चिनी ब्लॉगर्सनी शेअर केली आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, 2024 मध्ये अमेरिकन चित्रपटांनी चीनमध्ये 585 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली, जी चीनच्या 17.71 अब्ज डॉलर्सच्या बॉक्स ऑफिसच्या सुमारे 3.5 टक्के होती. वॉर्नर ब्रदर्स आणि लेजेंडरी यांचा अलिकडेच प्रदर्शित झालेला 'अ माइनक्राफ्ट' चित्रपट अमेरिकन चित्रपटांवर बंदी घातल्यानं 'जुरासिक वर्ल्ड: रिबर्थ', 'द अकाउंटंट 2' आणि 'मिशन इम्पॉसिबल' या सिक्वेलसारख्या आगामी चित्रपटांना चिनी बाजारपेठेत अब्जावधी डॉलर्सचं नुकसान होईल.

"चीन हे कधीच स्विकारणार नाही"

चीनच्या मंत्रालयानं जारी केलेल्या वक्तव्यानुसार, "चीनवर शुल्क वाढवण्याची अमेरिकेची धमकी ही आणखी एक चूक आहे, जी पुन्हा एकदा अमेरिकेच्या ब्लॅकमेलिंग वृत्तीवर प्रकाश टाकते. चीन हे कधीही स्वीकारणार नाही."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sikandar Box Office Collection Day 10: 'छावा'समोर 'सिकंदर' सुपरफ्लॉप, 10 दिवसांत बजेटही वसूल करता आलं नाही; आतापर्यंतच्या कलेक्शनचा आकडा ऐकाल तर...