China Gate villain Mukesh Tiwari : राजकुमार संतोषी यांचा चायना गेट हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही, पण या चित्रपटातील खलनायकाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं. या चित्रपटातल्या "जगीरा" या खलनायकाची भूमिका अभिनेता मुकेश तिवारी (China Gate villain Mukesh Tiwari) यांनी साकारली होती. त्यांच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांना शोले मधील गब्बर सिंगची आठवण झाली. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 27 वर्षे झाली असली तरी जगीराचे डायलॉग आजही लोकांच्या तोंडपाठ आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात अनेक मोठे कलाकार होते, तरीही मुकेश तिवारी (China Gate villain Mukesh Tiwari) यांनी त्यांच्या अभिनयाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ही त्यांची पहिलीच फिल्म होती आणि जगीराच्या भूमिकेत उतरून त्यांनी कमालीची मेहनत घेतली होती. (China Gate villain Mukesh Tiwari)
50 दिवस आंघोळ न केलेला अभिनेता
या चित्रपटात मुकेश तिवारी यांना डोंगरात राहणाऱ्या क्रूर डाकू 'जगीरा'ची भूमिका मिळाली होती. हे पात्र अधिक वास्तववादी दिसावं म्हणून त्यांनी जवळपास ५० दिवस आंघोळच केली नाही. ते मुद्दाम घाणेरडे दिसण्याचा प्रयत्न करत होते, जेणेकरून जगीराचा लुक अधिक भयावह वाटावा. दुर्गंधीपासून वाचण्यासाठी ते कायम परफ्युम वापरत असत. चित्रपटाचं चित्रीकरण डोंगरांमध्ये सुरू असताना चील-कावळे त्यांच्या भोवती घुटमळायचे. त्यांनी दाढीही केली नाही, केसही कापले नाहीत, त्यामुळे लोक त्यांना पाहून घाबरून पळून जायचे. एकदा घोडेस्वारी करत असताना त्यांचा घोडा बिथरला आणि ते पडून जखमी झाले. तरीही त्यांनी हार मानली नाही आणि चित्रीकरण सुरूच ठेवलं. त्यांचा प्रसिद्ध डायलॉग "मेरे मन को भाया, मैं कुत्ता काट के खाया" त्याकाळी खूप गाजला होता.
मोठ्या कलाकारांपेक्षा नवख्या मुकेश तिवारांनी जिंकली होती मनं
चायना गेटमध्ये मुकेश तिवारी यांच्यासोबत ओम पुरी, नसीरुद्दीन शाह, अमरीश पुरी आणि कुलभूषण खरबंदा यांसारखे दिग्गज कलाकार होते. तरीही, जगीराची भूमिका साकारून मुकेश तिवारी रातोरात प्रसिद्ध झाले. मात्र, त्यानंतर दोन वर्षे त्यांना कोणतंही काम मिळालं नाही. नंतर रोहित शेट्टी यांच्या गोलमाल मालिकेत त्यांनी 'वसूली भाई' हे पात्र साकारलं, ज्यामुळे ते पुन्हा प्रकाशझोतात आले. ही भूमिका इतकी लोकप्रिय झाली की आजही लोक त्यांना 'वसूली भाई' या नावानेच ओळखतात.
इतर महत्त्वाच्या बातम्या