एक्स्प्लोर

Chhaya Kadam Shares Post For Gaurav More: 'फिल्टरपाड्याच्या झोपडपट्टीतून...', दिग्गज अभिनेत्रीची 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेसाठी डोळे पाणावणारी पोस्ट

Chhaya Kadam Shares Post For Gaurav More: गौरवनं नव्या घरासोबतच आणखी एक गूड न्यूज दिलीय. गौरवनं गुपचूप लग्न उरकलं आहे. गौरवनं लग्न केलं असून, त्याच्या लग्नाची बातमी समोर आल्यानं अनेकांना सुखद धक्का बसलाय.

Chhaya Kadam Shares Post For Gaurav More: मुंबईत (Mumbai News) आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हेच स्वप्न 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) फेम गौरव मोरेनंही (Gaurav More) पाहिलं आणि आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सत्यात उतरवलंय. अगदी झोपडपट्टीतलं ताडपत्रीचं घर ते एका उच्चभ्रू सोसायटीतलं नवं आलिशान महालासारखं घर, गौरव मोरेनं आपल्या टॅलेंटच्या जोरावर आपलं स्वप्न पूर्ण केलंय. अमिताभ बच्चन यांचा फॅन असलेल्या गौरव मोरेच्या नावासमोर 'फिल्टरपाड्याचा बच्चन' (Filterpadyacha Bachchan) हे बिरुद चिकटलं आणि त्या नावानं त्याला ओळखलं जाऊ लागलं. आता त्यानं हेच नाव आपल्या नव्याकोऱ्या आलिशान घराला दिलंय. 

गौरवनं नव्या घरासोबतच आणखी एक गूड न्यूज दिलीय. गौरवनं गुपचूप लग्न उरकलं आहे. गौरवनं लग्न केलं असून, त्याच्या लग्नाची बातमी समोर आल्यानं अनेकांना सुखद धक्का बसलाय. त्यामुळे सध्या गौरववर डबल शुभेच्छांचा वर्षाव होतोय. गौरवच्या आनंदात अनेक कलाकार सहभागी झाले असून अनेकांच्या त्याच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली आणि त्याला शुभेच्छाही दिल्यात. अशातच आता आपल्या महाराष्ट्राचं नाव अगदी सातासमुद्रापार पोहोचवणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री छाया कदम यांनीही गौरवच्या नव्या घरी जाऊन त्याची भेट घेतली आणि त्याला शुभेच्छा दिल्यात. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन त्यांनी गौरवला शुभेच्छा दिल्यात. 

छाया कदम पोस्टमध्ये काय म्हणाल्यात? (Chhaya Kadam On Gaurav More)

अभिनेत्री छाया कदम यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की, "स्वप्न अस्वस्थ करतात. स्वप्न लढायला शिकवतात. स्वप्न जगायला शिकवतात. आणि तिच स्वप्न पूर्ण करण्यासाठी अमिताभ बच्चनजींच्या जुन्या हेअर स्टाइलच्या लहानपणापासून प्रेमात वेडा असलेला गौरव पुढे त्याच्या अशाच स्वप्नांचं एक घर उभं करतो. फिल्टरपाड्याच्या झोपडपट्टीतून रोज अंधार आकाशातील तारे पाहणारा गौरव, स्वतःच्या कष्टाने आणि कामावर असलेल्या अपार निष्ठेने एक दिवस स्वतः तारा होऊन जातो..."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Chhaya Kadam (@chhaya.kadam.75)

"जिद्द - चिकाटी आणि भारावलेपण घेऊन,अमिताभजींच्या प्रेमात 'भूतनाथ' झालेला गौरव, पुढे परिस्थितेच्या सगळ्या 'दिवार' तोडत, सोबत 'शहेनशाह'चा आत्मविश्वास घेऊन, आपल्या कामातून दरवेळी 'शोले' भडकवून, एक दिवस स्वतःच्या पायावर 'डॉन' सारखा उभा राहून, असल्या नसलेल्या सगळ्या शक्यतांना 'वजीर' होऊन चेकमेट करतो. तेव्हा तो सगळ्यांना आपला वाटतो आणि हेच त्याचे आपलेपण गौरवला 'फिल्टरपाड्याचा बच्चन' करतात...", असं म्हणत छाया कमद यांनी अगदी हटके अंदाजात गौरव मोरेवर कौतुकाचा वर्षाव केलाय. 

छाया कदम यांनी पुढे लिहिलंय की, "कारण या सगळ्या प्रवासात त्याच्यातला निखळ माणूस जराही हलत नाही. उलट तो अजून रोज नव्याने उजळत जातो. आणि काय कमाल आहे, ज्या झोपडपट्टीच्या मातीत गौरवचं बालपण गेले त्याचं झोपडपट्टीच्या जागेवर आज उंच बिल्डिंग बांधली गेली आहे, आणि त्या बिल्डिंगमध्ये असलेल्या एका सुंदर घरात गौरवच गृहप्रवेश झाला..."

"गौरव! तुझ्या एका जिद्दीने खूप जणांना स्वप्न पाहायची तू हिंमत दिलीस. अजून खूप मोठा हो. इतका मोठा हो की एक दिवस तुझ्या यशाचा 'जलसा' करायचा आनंद आम्हा सगळ्यांना मिळू दे. तुझ्या पुढील सगळ्या प्रवासासाठी शुभेच्छा. आणि घरासोबतच आयुष्यात आलेल्या जोडीदाराच्या ही खूप साऱ्या शुभेच्छा. खूप गोड आहे प्रियांका. बाकी, तुझ्यातला ‘नटवरलाल’  असा अभिनय क्षेत्रातले तुझे 'सरकार राज' अबाधित ठेवो. खूप खूप प्रेम. शुभेच्छा. आणि शेवटचे.... "परंपरा - प्रतिष्ठा और अनुशासन... मैं हूँ फिल्टरपाड्याचा बच्चन...", असं म्हणत गौरव मोरेला शुभेच्छा दिल्यात.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ritu Shivpuri Life Story: वयाच्या 56व्या वर्षी तिशीतलं ग्लॅमर, गोविंदाच्या 'लाल दुपट्टे वाली' गाण्यातली अभिनेत्री टेलिव्हिजनवरच्या 'बा'ची लेक; एक सिनेमा करुन ठरली 'वन फिल्म वंडर'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Marathi Season 6: बिग बॉस विजेत्याला ट्रॉफीसह मिळणार मोठं बक्षीस; 'इतक्या' लाखांचा धनादेश, Voting Lines कधीपर्यंत सुरू?
बिग बॉस विजेत्याला ट्रॉफीसह मिळणार मोठं बक्षीस; 'इतक्या' लाखांचा धनादेश, Voting Lines कधीपर्यंत सुरू?
Patralekha: आई झाल्यानंतर अभिनेत्रीचं वाढलं वजन, बॉडी शेमिंगमुळे ट्रोल; Actress ने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली..
आई झाल्यानंतर अभिनेत्रीचं वाढलं वजन, बॉडी शेमिंगमुळे ट्रोल; Actress ने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली..
Actress Divorce: अभिनेत्री हंसिकानं 4 वर्षांच्या संसाराला दिला पूर्णविराम; काडीमोड घेण्यामागचं कारण काय? म्हणाली, 'मला पश्चाताप...'
अभिनेत्री हंसिकानं 4 वर्षांच्या संसाराला दिला पूर्णविराम; काडीमोड घेण्यामागचं कारण काय? म्हणाली, 'मला पश्चाताप...'
Bigg Boss Marathi: फिनालेपूर्वी बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट! 3 कलाकारांची 'धुरंधर' एन्ट्री; नेमकं काय घडणार? पुन्हा गेम पालटणार?
फिनालेपूर्वी बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट! 3 कलाकारांची 'धुरंधर' एन्ट्री; नेमकं काय घडणार? पुन्हा गेम पालटणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
Shrikant Shinde On Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शुभेच्छा! ऑन आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष ..
Yunus Shaikh On Sahar Shaikh : सहर नॉटरिचेबल? जात प्रमाणपत्र अवैध? वडिलांचं एका शब्दात उत्तर
Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
Gold : 2026 मध्ये सोन्याचे दर 10 टक्क्यांनी वाढले,अक्षय तृतीयेपूर्वी सोन्यात चढ-उतार; पुढे काय होणार, मोतिलाल ओसवालचा अहवाल काय सांगतो?
2026 मध्ये सोन्याचे दर 10 टक्क्यांनी वाढले, पुढं काय होणार,मोतिलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचा अहवाल काय सांगतो?
'तुम्ही केवळ राजकीय संघटना, पूर्ण भारत नाही, भारतीय लष्कर नाही, तुम्ही म्हणजे भारतीय नाही; डरपोकांसारखे लष्करामागे लपू नका, आम्ही टीका तुमच्यावर करतोय, देशावर नाही, समोर या आणि बोला'
'तुम्ही केवळ राजकीय संघटना, पूर्ण भारत नाही, भारतीय लष्कर नाही, तुम्ही म्हणजे भारतीय नाही; डरपोकांसारखे लष्करामागे लपू नका, आम्ही टीका तुमच्यावर करतोय, देशावर नाही, समोर या आणि बोला'
खासगी ट्रॅव्हल्स अन् कारचा भीषण अपघात; 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला
खासगी ट्रॅव्हल्स अन् कारचा भीषण अपघात; 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला
जपानच्या कंपनीवर आता मराठी माणसाचा झेंडा, शार्प इंडिया कंपनीत स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीची 75 टक्के मालकी
जपानच्या कंपनीवर आता मराठी माणसाचा झेंडा, शार्प इंडिया कंपनीत स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीची 75 टक्के मालकी
Embed widget