छावा चित्रपट फूट पाडणारा म्हणाले, ए आर रहमान यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर 'छावा' चे लेखक स्पष्टच म्हणाले ..
‘छावा’च्या संगीताची जबाबदारी स्वतः ए. आर. रेहमान यांनी सांभाळली आहे. बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी चित्रपटाच्या यशामागे वादग्रस्त घटकांचा वाटा असल्याचे सूचित केले होते.

Chhava writer reaction on A R Rahman statement: विकी कौशलच्या ‘छावा’ या ऐतिहासिक चित्रपटावर संगीतकार ए आर रहमान यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलेलं. त्यांच्या या वक्तव्यावर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली. हा चित्रपट विभाजन करणारा असून विभाजनाला भांडवल वापरलं आहे, असं मला वाटतं. असं रहमान म्हणाले होते. या वक्तव्यावर आता चित्रपटाचे लेखक ऋषी विरमानी यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. ‘छावा’ हा समाजात फूट पाडणारा सिनेमा असल्याची टीका रेहमान यांनी केली होती.
छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित असलेल्या या चित्रपटाबद्दल बोलताना रेहमान यांनी तो “फूट पाडणारा” असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली. आता या टीकेला उत्तर देताना चित्रपटाचे लेखक ऋषी विरमानी यांनी चित्रपटाच्या आशयाचे समर्थन केले आहे.
काय म्हणाले छावाचे लेखक ?
एका मुलाखतीत विरमानी म्हणाले की, एखादा चित्रपट काही तासांचा असतो आणि तो लोकांची वर्षानुवर्षे घडलेली विचारसरणी एका रात्रीत बदलू शकत नाही. प्रेक्षक परिपक्व असून ते स्वतः विचार करून मत बनवतात, असे त्यांनी ठामपणे सांगितले. ‘छावा’ला प्रेक्षकांकडून मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक असल्याचेही त्यांनी सांगितले. विरमानी पुढे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांसारख्या पराक्रमी ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वावर चित्रपट खूप आधी व्हायला हवा होता. या चित्रपटातून त्यांच्या बलिदानाची कथा अधिक व्यापक पातळीवर पोहोचेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. भारताबरोबरच परदेशातही या चित्रपटाला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांची ही कमेंट सध्या चर्चेत आहे.
दरम्यान, विशेष म्हणजे ‘छावा’च्या संगीताची जबाबदारी स्वतः ए. आर. रेहमान यांनी सांभाळली आहे. बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी चित्रपटाच्या यशामागे वादग्रस्त विषयांचा वाटा असल्याचे त्यांनी सुचवलं होतं. प्रेक्षक स्वतः योग्य-अयोग्य ठरवू शकतात, असेही ते म्हणाले होते. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’मध्ये विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तसेच रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या वादामुळे चित्रपट पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
























