Chhaava Box Office Collection Day 32: विक्की कौशलचा (Vicky Kaushal) 'छावा' (Chhaava Movie) 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, विक्की कौशल, रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि अक्षय खन्ना (Akshaye Khanna) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची जादू एक महिना उलटूनही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. या चित्रपटानं पाचव्या आठवड्यात प्रचंड कमाई केली आणि अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले. 'छावा'नं रिलीजच्या 32 व्या दिवशी म्हणजे, पाचव्या सोमवारी किती कमाई केली? सविस्तर जाणून घेऊयात... 

'छावा'नं 32 व्या दिवशी किती कमाई केली?

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा चित्रपट दररोज बॉक्स ऑफिसवर धमुकाळ घालतोय. हिस्टॉरिकल चित्रपट 'छावा' छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित आहे. या चित्रपटात विक्की कौशलनं मुख्य भूमिका साकारली आहे. हा पीरियड ड्रामा विक्की कौशलच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ओपनर चित्रपट आहे. तसेच, सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. रिलीजच्या पाचव्या आठवड्यात, या चित्रपटानं इतर सर्व चित्रपटांना मागे टाकून इतिहास रचला आणि सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांचा विक्रम केला. दरम्यान, पाचव्या सोमवारी 'छावा'च्या कमाईत मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या आतापर्यंतच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर

  • पहिल्या आठवड्यात 'छावा'ची कमाई 219.25 कोटी रुपये होती.
  • दुसऱ्या आठवड्यात 'छावा' चित्रपटाचं कलेक्शन 180.25 कोटी रुपये होतं.
  • 'छावा'नं तिसऱ्या आठवड्यात 84.05 कोटी रुपये कमावले.
  • 'छावा'नं चौथ्या आठवड्यात 55.95 कोटी रुपये कमावले.
  • 29 व्या दिवशी चित्रपटानं 7.25 कोटी रुपये कमावले.
  • 'छावा'चा 30 व्या दिवशी 7.9 कोटींचा व्यवसाय झाला.
  • या चित्रपटानं 31 व्या दिवशी 8 कोटी रुपये कमावले.
  • आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या 32 व्या दिवसाच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
  • सॅकॅनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'छावा'नं रिलीजच्या 32 व्या दिवशी 2.65 कोटींची कमाई केली आहे.
  • यासह, 'छावा' चित्रपटाचं 32 दिवसांत एकूण कलेक्शन आता 565.3 कोटी रुपये झालं आहे.

'छावा' आता 'स्त्री 2'चा रेकॉर्ड मोडण्यापासून काही पावलं दूर

'छावा' गेल्या एक महिन्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या फिल्मनं आतापर्यंत गदर 2, पठान आणि अॅनिमलसारख्या फिल्मला मात देऊन टॉप 10 चित्रपटांच्या लिस्टमध्ये आठव्या क्रमांकावर आपलं स्थान निर्माण केलं आहे. अशातच स्त्री 2 चं लाईफटाईम कलेक्शनचा (597.99 कोटी) रेकॉर्ड मोडण्यापासून काही पावलं दूर आहे. दरम्यान, 'छावा'चं 32 दिवसांचं एकूण कलेक्शन सध्या 565 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. अशातच स्त्री 2 ला मात देण्यासाठी 32 कोटींची कमावण्याची गरज आहे. सहाव्या आठवड्यापर्यंत 'छावा' हा टप्पा पार करू शकेल की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Chhaava Box Office Collection Day 32: भाईजानच्या 'सिकंदर'मुळे अडचणीत सापडणार 'छावा'? आतापर्यंत किती कोटींचा गल्ला?