Chhaava Box Office Collection Day 30: विक्की कौशलचा (Vicky Kaushal) 'छावा' (Chhaava Movie) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस गाजवतोय. चित्रपट रिलीज होऊन 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये दाखल झाला होता. आता चित्रपट रिलीज होऊन महिना उलटून गेला. प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड सातत्यानं मोडले आहेत. विक्की कौशलचा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. नुकताच नवा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही, विक्की कौशलच्या चित्रपटाच्या कमाईवर कोणताही विशेष परिणाम झालेला नाही. मीडिया वृत्तानुसार, पाचव्या आठवड्याच्या शनिवारी 'छावा'नं चांगली कमाई केली आहे. 


शनिवारी 'छावा'ची धमाकेदार कमाई 


'छावा' चित्रपटाचं सर्वत्र कौतुक होत आहे. अशातच आता विक्की कौशलच्या चित्रपटानं भल्या भल्या दिग्गजांच्या बॉलिवूडपटांना मागे टाकलं आहे. 'छावा'चे जबरदस्त सीन्स, डायलॉग्स, म्युझिक, स्टारकास्ट साऱ्याच गोष्टींचं प्रेक्षकांसोबत समीक्षकांकडूनही कौतुक होत आहे.  'छावा'सोबतच विक्कीनं त्याचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट उरी द सर्जिकल स्ट्राईकला देखील मागे टाकलं आहे. अशा परिस्थितीत, 'छावा' आता त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट बनला आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा हा चित्रपट दिवसेंदिवस बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम रचत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विक्की कौशलच्या 'छावा' चित्रपटानं पाचव्या शनिवारी 6.5 कोटी रुपयांचा व्यावसाय केला. या चित्रपटानं हिंदीमध्ये आतापर्यंत तब्बल 512 कोटींची कमाई केली आहे. तर, तेलुगुमध्ये 12.55 कोटींची कमाई केली आहे. 






'छावा' मोडणार शाहरुख खानच्या 'या' फिल्मचा रेकॉर्ड? 


पाचव्या आठवड्यातील कमाईच्या बाबतीत 'छावा'नं रणबीर कपूरचा चित्रपट अॅनिमलला मागे टाकलं आहे. त्यासोबतच छावा हाईएस्ट ग्रॉसर फिल्म्सच्या लिस्टमध्ये (हिंदी वर्जन असणाऱ्या फिल्म्स) सहाव्या स्थानी आहे. दरम्यान, 'छावा' 2023 मध्ये थिएटरमध्ये रिलीज करण्यात आली होती. याव्यतिरिक्त 'छावा' लवकरच शाहरुख खानची फिल्म पठाणचा रेकॉर्ड मोडणार आहे.  


'छावा'कडून 'पुष्पा 2'ला धोबीपछाड


अल्लू अर्जुनची फिल्म  पुष्पा 2 नं घरगुती बॉक्स ऑफिसवर 1234.1 कोटी रुपये कमावले, तर 'छावा'नं अद्याप त्याच्या कमाईच्या निम्म्याही गाठलेल्या नाहीत. असं असूनही, पुष्पा 2 च्या निर्मात्यांपेक्षा चित्रपटाच्या निर्मात्यांना जास्त फायदा झाला आहे. त्यामुळे 'छावा'नं पुष्पा 2 ला मागे टाकलं आहे. 


प्रत्यक्षात पुष्पा 2 हा चित्रपट 500 कोटींमध्ये बनवण्यात आला होता आणि त्यानं 1234.1 कोटी रुपये कमाई करून बजेटपेक्षा 246.82 टक्के जास्त कमाई केली. तर छावा हा चित्रपट फक्त 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. त्यानुसार, चित्रपटानं आतापर्यंत त्याच्या बजेटपेक्षा सुमारे 435 टक्के जास्त कमाई केली आहे. म्हणजेच, या चित्रपटानं अल्लू अर्जुनच्या चित्रपटाला जवळजवळ 200 टक्के मागे टाकलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Chhaava Box Office Collection Day 30: 'छावा'चा बॉक्स ऑफिसवर नादखुळा परफॉर्मन्स; 'पुष्पा 2'वरही केली मात, फक्त एकाच महिन्यात 435 टक्के बजेटची वसुली