Chhaava Box Office Collection Day 3: छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) पुत्र छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जीवनावर आधारित 'छावा' चित्रपट (Chhaava) सध्या चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. 2025 या वर्षाला दमदार सुरुवात देणाऱ्या विक्की कौशलच्या चित्रपटानं अवघ्या तीन दिवसांत प्रचंड कमाई केली आहे. ओपनिंग विकेंडला तर 'छावा'नं धुमाकूळ घालत बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुवांधार कमाई केली.
लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) दिग्दर्शित 'छावा' या चित्रपटानं फक्त आणि फक्त तीनच दिवसांत 100 कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटानं 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्वच्या सर्व चित्रपटांना धूळ चारली आहे. खरं तर, या वर्षी आतापर्यंत कोणताही चित्रपट बंपर हिट ठरू शकलेला नाही. पण, 'छावा' रिलीज झाला आणि बॉक्स ऑफिसवर जणू वादळंच आलं. 'छावा'नं अक्षय कुमार आणि वीर पहाडिया यांच्या 'स्काय फोर्स'च्या लाईफटाईम कमाईचा आकडा फक्त तीनच दिवसांत ओलांडला आहे.
'छावा'ची तिसऱ्या दिवशीची कमाई केली?
'छावा' व्हॅलेंटाईन डे म्हणजेच, 14 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा हिस्टॉरिकल ड्रामा असलेला चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाला समीक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आणि विक्की कौशल अभिनीत 'छावा' चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही खूप प्रेम मिळत आहे. यामुळेच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाची सुरुवात खूप चांगली झाली आणि आठवड्याच्या शेवटीही 'छावा'वर पैशांचा पाऊस पडला. जर चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर...
- सॅकॅनिल्कच्या आकडेवारीनुसार, 'छावा'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 31 कोटी रुपयांची कमाई केली.
- दुसऱ्या दिवशी चित्रपटानं 19.35 टक्क्यांनी वाढ करून 37 कोटी रुपये कमावले.
- आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच पहिल्या रविवारी झालेल्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
- सॅकॅनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'छावा'नं रिलीजच्या तिसऱ्या दिवशी 49.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
- यासह, 'छावा'ची तीन दिवसांत एकूण कमाई आता 117.50 कोटी रुपये झाली आहे.
तीन दिवसांत 'छावा'ची वर्ल्डवाईल्ड कमाई किती?
'छावा'चं बजेट जवळपास 130 कोटीं इतकं आहे. त्यामुळे असं मानलं जात आहे की, ही फिल्म चौथ्या दिवसापर्यंत आपलं भांडवलं अगदी सहज वसूल करेल. अशातच वर्ल्डवाइड कलेक्शनबाबत बोलायचं झालं तर, 'छावा'नं दोनच दिवसांत 100 कोटींचा आकडा पार केला होता. आता फिल्मच्या कलेक्शनचे आकडे पाहिल्यानंतर असं बोललं जात आहे की, तीन दिवसांतच फिल्मनं वर्ल्डवाईल्ड जवळपास 160 कोटींचं कलेक्शन केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :