Chhaava Box Office Collection Day 24: विक्की कौशलचा (Vicky Kaushal) 'छावा' चित्रपट (Chhaava Movie) 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होऊन 24 दिवस झाले आहेत आणि चित्रपट अजूनही मोठा पडदा गाजवतोय. 'छावा' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि त्यामुळेच हा चित्रपट दररोज नवा विक्रम रचतोय.
'छावा'नं आतापर्यंत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकलं आहे. तसेच, त्याचं रेकॉर्डब्रेक कलेक्शन जोमात सुरू आहे. 'छावा'ची निर्मिती केलेल्या प्रोडक्शन हाऊसच्या मते, चित्रपटानं पहिल्या आठवड्यात 225.28 कोटी रुपयांची कमाई केली. तर, दुसऱ्या आठवड्यात 186.18 कोटी रुपये आणि तिसऱ्या आठवड्यात 84.94 कोटी रुपये कमावले. तर, 22व्या दिवशी चित्रपटानं 6.3 कोटी रुपये आणि 23 व्या दिवशी 13.70 कोटी रुपये कमावले. 'छावा'नं 23 दिवसांत एकूण 516.40 कोटी रुपये कमावले.
चोविसाव्या दिवशी 'पुष्पा 2'ला पछाडलं
तेलुगू वर्जनमध्ये, चित्रपटानं दोन दिवसांत 5.94 कोटींचा व्यवसाय केला आणि यासह, 23 दिवसांत 'छावा'चं एकूण कलेक्शन 522.34 कोटी रुपये झाले. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, चित्रपटानं 24 व्या दिवशी 11.5 कोटी रुपये कमावले आहेत. अशाप्रकारे, या चित्रपटानं अल्लू अर्जुनच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा 2' चा विक्रम मोडला आहे. खरं तर, 'पुष्पा 2'नं रिलीजच्या 24 व्या दिवशी फक्त 10 कोटी रुपये कमावले. तर 'छावा'चा 24 व्या दिवसाचं कलेक्शन 'पुष्पा 2' पेक्षा 1.5 कोटींनी जास्त आहे.
'गदर 2'ला मागे टाकल्यानंतर आता 'छावा' 'पठाण'ला मागे टाकणार?
'छावा'नं आता 24 दिवसांत भारतात एकूण 533.84 कोटी रुपये कमावले आहेत. या प्रभावी कलेक्शनसह, विक्की कौशलच्या चित्रपटानं सनी देओलच्या 'गदर 2' (525.7 कोटी) ला मागे टाकलं आहे आणि भारतातील सर्वाधिक कमाई करणारा दहावा चित्रपट बनला आहे. आता, 'छावा' शाहरुख खानच्या पठाण (543.09) ला तोडण्याच्या जवळ आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :