Chhaava Box Office Collection Day 20: विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) स्टारर 'छावा' हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तेव्हापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) वर्चस्व गाजवत आहे. 'छावा' रिलीज होताच त्यानं बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम ठेवला. असं असलं तरीसुद्धा 'छावा'च्या कमाईचा वेग काही कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत. तिसऱ्या आठवड्यातही 'छावा' कोटींचा व्यवसाय करत आहे. चित्रपटानं रिलीजच्या 20 व्या दिवशी म्हणजेच, तिसऱ्या बुधवारी किती कमाई केली? सविस्तर जाणून घेऊयात... 


'छावा'नं विसाव्या दिवशी किती कमाई केली?


विक्की कौशलचा ऐतिहासिक चित्रपट 'छावा' छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आणि मुघल आक्रमणापासून आपल्या मातृभूमीला वाचवण्यासाठी त्यांनी दाखवलेल्या निर्भय धाडसाच्या कथेवर आधारित आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मराठा राजाच्या निष्ठेचं उत्तम चित्रण रुपेरी पडद्यावर केलं आहे. ज्यामुळे त्यांनी लोकांची मनं जिंकली आहेत. वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनलेला 'छावा' भरपूर कमाई करत असताना, त्यानं सुलतान, बाहुबली: द बिगिनिंग, सालार पार्ट 1 यासह काही सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांचे रेकॉर्डही मोडले आहेत.


दरम्यान, दोन आठवड्यांपर्यंत मोठी कमाई केल्यानंतर, तिसऱ्या आठवड्यात 'छावा'च्या कलेक्शनमध्ये घट दिसून आली. परंतु तरीही 'छावा' चांगली कमाई करत आहे. यासह, 'छावा' 500 कोटींचा चित्रपट बनण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. या सगळ्यामध्ये, जर आपण चित्रपटाच्या आतापर्यंतच्या कमाईबद्दल बोललो तर, सॅकोनिल्कनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 



  • 'छावा'नं रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 219.25 कोटी रुपये कमावले होते.

  • दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाची कमाई 180.25 कोटी रुपये होती.

  • यानंतर, चित्रपटानं 15 व्या दिवशी 13 कोटी आणि 16 व्या दिवशी 22 कोटी रुपये कमावले.

  • 'छावा' चित्रपटाचे 17 व्या दिवशी 24.25 कोटी रुपयांचं कलेक्शन झालं.

  • 18 व्या दिवशी चित्रपटानं 7.75 कोटी रुपये कमावले आणि 19 व्या दिवशी 'छावा'चं कलेक्शन 5.4 कोटी रुपये होतं.

  • आता चित्रपट रिलीज झाल्यानंतर 20 व्या दिवशीच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.

  • सॅकॅनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'छावा'नं रिलीजच्या 20 व्या दिवशी 5.75 कोटींचा गल्ला जमवला आहे.

  • यासह, 'छावा'ची 20 दिवसांत एकूण कमाई 477.65 कोटी रुपये झाली आहे.




'छावा' 20 व्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा पाचवा चित्रपट 


'छावा'ची कमाई तिसऱ्या आठवड्यातही घसरत आहे, पण तरीही तो दररोज अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत आहे. रिलीजच्या विसाव्या दिवशी, 'छावा'नं 5.75 कोटींची कमाई करून स्त्री 2, अ‍ॅनिमल आणि जवान, पठाण यासह अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.



  • स्त्री 2 नं 20 व्या दिवशी 5.5 कोटी रुपये कमावले.

  • अ‍ॅनिमलचं 20 व्या दिवसाचं कलेक्शन 4.7 कोटी रुपये होतं.

  • विसाव्या दिवशी 'जवान'नं 4.4 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

  • पठाणनं विसाव्या दिवशी 4.1 कोटी रुपये कमावले होते.

  • विसाव्या दिवशी पद्मावतची कमाई 3.75 कोटी रुपये होती.


महत्त्वाच्या इतर बातम्या :