Chhaava Actress Rashmika Mandana Instagram Post: छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) आयुष्यावर आधारित असलेला 'छावा' (Chhaava Movie) सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. फक्त दोनच दिवसांतच 'छावा'नं आपल्या भांडवलाच्या 55 टक्के रक्कम कमावली आहे. अशातच 'छावा'मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विक्की कौशल आणि महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) झळकली आहे. दोघांच्याही अभिनयाचं सर्वच स्तरांतून जोरदार कौतुक केलं जात आहे. अशातच चित्रपटाला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर रश्मिका मंदानानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 


'छावा'ला सध्या तुफान प्रतिसाद मिळत आहे. अशातच 'छावा'मध्ये महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत झळकलेल्या रश्मिका मंदानानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. रश्मिकानं पोस्ट करत दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचे आभार मानले आहेत. तसेच, महाराणी येसूबाई रुपेरी पडद्यावर साकारणं हा अनुभव तिच्यासाठी कसा होता, हे देखील सांगितलं आहे. 


सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये रश्मिका नेमकं काय म्हणाली?


महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत झळकलेली दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना म्हणाली की, "मी वक्त्यापेक्षा चांगलं लिहू शकते, म्हणून हे... मी मिमी हा चित्रपट पाहिला होता आणि मला तो चित्रपट इतका आवडला की मला लक्ष्मण सरांना माझ्या 'गुडबाय' चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी आमंत्रित करायचं होतं आणि म्हणून मी त्यांना मेसेज केला आणि तेव्हाच प्रवास सुरू झाला. सरांनी लगेच मला विचारलं की, ते मला फोन करू शकतात का? आणि आम्ही बोललो, ते मला सांगत होते की, त्यांना त्यांच्या पुढच्या चित्रपटासाठी मला भेटायचंय... आणि मला वाटलं की, ती फक्त चांगलं बोलत आहे, पण प्रत्यक्षात भेट झाली आणि त्यामुळे मला खूप आनंद झाला की ते घडलं... मी याबद्दल विश्वाचे खरोखर आभार मानते..."






रश्मिकानं पुढे लिहिलं आहे की, "मला कथा माहीत नव्हती. ते माझ्याकडे का आले, हे मला माहीत नव्हतं, त्यांनी मला महाराणी म्हणून कसं पाहिलं हे मला माहीत नव्हतं. मला काय घडतंय, हे देखील माहीत नव्हतं... जेव्हा मी प्रत्यक्षात स्क्रिप्ट ऐकली, तेव्हा मी गोंधळले, धक्का बसला... पण खूप कृतज्ञ वाटत होतं, भारावून गेलेले आणि इतका आनंदी झाला की, मला काय बोलावं हेच कळत नव्हतं. कारण मला माहीत नव्हतं की, आपण हे कसं साध्य करणार आहोत."


"महाराणी येसूबाईची भूमिका साकारणारी दक्षिणेकडची एक मुलगी... माझ्या मनात कधीच असं नव्हतं... मला कधीच वाटलं नव्हतं की, ते शक्य आहे, आणि म्हणूनच मला अशा लोकांसोबत काम करायला आवडतं जे आपल्याला सीमांच्या पलीकडे स्वप्न पाहण्याची आशा देतात...", असं रश्मिका म्हणाली आहे. 


"आणि मग महाराणी रुपेरी पडद्यावर अतरली. ती शक्तिशाली आहे... ती सुंदर आहे... ती एक खरी राणी आहे... तिचं प्रेम हेच प्रेम आहे, ज्याच्याशी मी खरोखरच जोडले गेले. ते इतकं शुद्ध आहे की, ते दैवी आहे आणि इतकं आदरणीय आहे, इतकं खरं आहे की, महाराज आणि महाराणी नेहमीच शब्दांच्या पलीकडे जोडलेले असतात.", असं म्हणाली. 


पाहा व्हिडीओ : विक्की कौशल, रश्मिका मंदानाचा Exclusive Interview



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Chhaava Box Office Collection Day 2: आया आया आया रे तुफान... 'छावा'नं बॉक्स ऑफिस हादरवलं, दुसऱ्याच दिवशी बजेटच्या 55 टक्क्यांची कमाई