Chetan Hansraj Playing 7 Characters In 4000 Crore Ramayana: नितेश तिवारी (Nitesh Tiwari) दिग्दर्शित 4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमा (Ramayana Movie) सध्या चर्चेत आहे. या सिनेमाच्या बजेटपासून ते स्टार कास्टपर्यंत (Ramayana Movie Star Cast) सारेच ट्रेंडमध्ये आहे. 'रामायण: भाग 1'चा (Ramayana Part 1) टीझर 30 जुलै रोजी प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये प्रभू श्रीराम (रणबीर कपूर), सीता (साई पल्लवी), लक्ष्मण (रवी दुबे), दशरथ (अरुण गोविल), रावण (यश) आणि शूर्पणखा (रकुल प्रीत सिंह) यांसारख्या पात्रांची झलक पाहायला मिळाली. पण, त्यासोबतच इतर पात्रांचीही झलक दिसून आली. या कलाकारांच्या फळीत अशा एका अभिनेत्याचा समावेश आहे ज्यानं 4000 कोटींच्या सिनेमात सात वेगवेगळ्या भूमिका साकारल्यात. विशेष म्हणजे, यापूर्वी त्यानं 'महाभारत' मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारून लोकप्रियता मिळवली होती. त्यामुळे आगामी 'रामायण' सिनेमात तो साकारत असलेल्या भूमिकांबाबत चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.
'हा' अभिनेता साकारतोय रावणाच्या आजोबांची भूमिका (Chetan Hansraj Plays Role Of Ravan Gradfather)
4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात सात वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेता म्हणजे, चेतन हंसराज. आधीच 'महाभारत' मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारुन प्रसिद्धी मिळवलेला हा अभिनेता 'रामायण'मध्ये रावणाच्या आजोबांची भूमिका साकारणार आहे. टीझरमध्ये त्याची फक्त एक झलकच खिळवून ठेवते.
गमतीची गोष्ट म्हणजे, त्यानं यापूर्वी बी. आर. चोप्रा यांच्या 'महाभारत' मालिकेत तरुण बलरामची भूमिका साकारली होती. त्याव्यतिरिक्त, तो 'जोधा अकबर', 'कहानी घर घर की' आणि 'धरती का वीर योद्धा पृथ्वीराज चौहान' यांसारख्या मालिकांमध्येही झळकलाय. तसेच, त्याने 'डॉन' आणि 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा!' यांसारख्या सिनेमांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
'रामायण' सिनेमात साकारणार 7 भूमिका (Chetan Hansraj Playing 7 Characters In Ramayana)
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अभिनेता चेतन हंसराजनं कन्फर्म केलं की, "रामायण' सिनेमात तो रावणाचे आजोबा माली यांची भूमिका साकरणार आहे. तसेच, पुढे बोलताना अभिनेता म्हणाला की, "राजा माली 'रामायण'मधलं अत्यंत महत्त्वाचं पात्र आहे, जो इतिसात फार मोठी भूमिका बजावतो. यशसोबतचे माझे सीन्स जबरदस्त आहेत. स्क्रीनवर ते सीन्स पाहणं खरंच खूप भारी आहे आणि ही दोन्ही पात्र एकमेकांसोबत खूपच चांगली वाटतात. ही माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे, माझा पार्ट पूर्ण झाल्यानंतर, मला रावणाचा भाऊ आणि एका राक्षसासह सहा 'मोशन-कॅप्चर' पात्रांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली..."
'रामायणम' आणि रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेची तुलना करण्याबाबतच्या प्रतिक्रिया (Chetan Hansraj On Ramayana Tv Serial)
'रामायणम'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच सिनेमाची तुलना रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेच्या ट्रेलरशी केली जात आहे. यावर ते म्हणाले, "आमच्याकडे हॉलिवूड आणि बॉलिवूडमधील टेरी नोटरींसारखे सर्वोत्तम ॲक्शन दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ आहेत. आजचे सिनेनिर्माते प्रेक्षकांना एक उत्कृष्ट सिनेमॅटिक अनुभव देऊ इच्छितात आणि आपण या दृष्टिकोनाचं कौतुक केलं पाहिजे. मला खात्री आहे की, जे लोक हा सिनेमा योग्य व्यासपीठावर पाहतील, ते या सर्व तुलना विसरून जातील..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
