एक्स्प्लोर

TV Actress Charu Asopa: प्रेग्नन्सीदरम्यान पतीनं फसवलं; बॅगेत सापडलेल्या ‘त्या’ वस्तूमुळे अभिनेत्रीला आलेला संशय अन् मोडलेला संसार

मुलीला तिच्या आजी आजोबांपासून आणि कुटुंबातील इतर सदस्यांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्याच्या टीकेला ही तिने उत्तर दिलं.

TV Actress Charu Asopa: मनोरंजनसृष्टीत अनेक चेहरे हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहतात. सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनसोबत लग्न केलेली अभिनेत्री आता मुली सोबत आनंदाने आयुष्य घालवत आहे. टीव्ही अभिनेत्री चारु असोपाने (Charu Asopa) 2019 मध्ये अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनसोबत (Rajiv Sen) लग्न केलं होतं. 2021 मध्ये त्यांना मुलगी झाली. मात्र, मुलीच्या जन्मानंतर त्यांच्यात वैवाहिक आयुष्यात अडचणी सुरू झाल्या. अखेर 2023 मध्ये दोघेही एकमेकांपासून विभक्त झाले.

अलीकडेच दिलेल्या एका व्लॉगमध्ये तिने मुंबईहून बिकानेरला स्थलांतरित झाल्याचा सांगितलं. मुंबईत एका विशिष्ट प्रकारची जीवनशैली टिकवून ठेवण्याचा आर्थिक दबाव वाढत असल्यामुळे मुंबईच्या बाहेर निघून जाण्याचा निर्णय तिने घेतल्याच सांगितलं.

2019 मध्ये झालेलं लग्न

चारु असोपा आणि राजीव सेन यांनी 2019 मध्ये लग्न केलं. मात्र, त्यांच्या नात्यात सुरुवातीपासूनच अनेक चढ-उतार आले. चारुने एका मुलाखतीत त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत अनेक धक्कादायक दावे केले होते. चारुच्या म्हणण्यानुसार, तिला राजीवच्या बॅगेत काही प्रायवेट वस्तू सापडल्या होत्या. त्यानंतर तिला राजीव यांच्यावर संशय येऊ लागला. 

प्रेग्नन्सीदरम्यान पतीने धोका दिल्याचा आरोप

चारु असोपाने आरोप केलेला की, त्या प्रेग्नंट असताना राजीवने  तिला फसवलेलं. राजीव अनेकदा बराच वेळ घराबाहेर राहत होते आणि रात्री उशिरा घरी परतत होता, असं चारुने सांगितलं. ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत चारुने सांगितलेलं की, राजीव अनेकदा वेगवेगळी कारणं सांगायचा. कधी ट्रॅफिक कमी होण्याची वाट पाहण्यासाठी वांद्रे येथील कॅफेमध्ये बसल्याचं तो सांगायचा, तर कधी आपल्या कारमध्येच रात्र काढल्याचा म्हणायचा.

फिजिकल व्हायलन्सचाही आरोप

चारुने राजीववर शारीरिक हिंसाचार केल्याचाही आरोप केला होता. त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दाखल केल्याचंही सांगितलं. मात्र, राजीवने माफी मागितल्यानंतर ती अनेकदा त्याला माफ करत असल्याचं चारुने म्हटलं.एका टप्प्यावर चारुने घटस्फोटाचा निर्णय मागे घेतला होता. राजीवने स्वतःमध्ये सुधारणा करण्याचं आश्वासन दिल्यामुळे तिने पुन्हा नात्याला संधी दिली. विशेष म्हणजे, मुलीसाठी तिने हा निर्णय घेतला होता. मात्र, परिस्थितीत अपेक्षित बदल झाला नाही आणि अखेर दोघेही वेगळे झाले. दरम्यान, राजीव सेन यांनी चारुने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते. उलट त्याने चारुवरच अभिनेता करण मेहरासोबत अफेअर असल्याचा आरोप केला होता. मात्र, चारुने हा दावा खोटा असल्याचं स्पष्ट केलेलं. मुलीला तिच्या आजी आजोबांपासून आणि कुटुंबातील इतर सदस्यांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्याच्या टीकेला ही तिने उत्तर दिलं. तिच्या मुलीला दोन्ही कुटुंबातील सदस्यांना किंवा तिच्या वडिलांना भेटण्यापासून कधीही रोखलं नसल्याचं ती म्हणाली. दरम्यान राजीव सेन त्याच्या मुलीसोबत अनेकदा वेळ घालवताना दिसतो.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajeev Sen (@rajeevsen9)

मुलीसाठी नॉर्मल नातं ठेवण्याची इच्छा

चारुने सांगितलेलं की, तिला मुलीसाठी राजीवसोबत एक Normal नातं कायम ठेवायचं आहे. मुलीला तिच्या वडिलांसोबत वेळ घालवण्याचा पूर्ण अधिकार आहे, असं तिचं म्हणणं आहे. आपल्या आई-वडिलांना एका खराब नात्यात पाहण्याची वेळ मुलीवर येऊ नये, अशीही तिची इच्छा आहे. चारु असोपा ही टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने ‘मेरे अंगने में’, ‘देवों के देव...महादेव’, ‘जीजी मां’, ‘बालवीर’ आणि ‘लाडो 2’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radha Patil: नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
Megha Ghadge on Ashok Saraf: 'अशोक सराफ यांच्यासोबत रोमँटिक सीन पण...'; 'पछाडलेला' फेम अभिनेत्रीने सांगितला 'आठवणीतला किस्सा'
'अशोक सराफ यांच्यासोबत रोमँटिक सीन पण...'; 'पछाडलेला' फेम अभिनेत्रीने सांगितला 'आठवणीतला किस्सा'
Colors Marathis Mi Jinkun Ghein Saar: 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये रंगणार मंगळागौरीचा उत्साह; राजगुरु वाड्यात जेसिकाची एन्ट्री, छवीसमोर संकट
'मी जिंकून घेईन सारं'मध्ये रंगणार मंगळागौरीचा उत्साह; राजगुरु वाड्यात जेसिकाची एन्ट्री, छवीसमोर संकट
Preity Zinta on Tukaram Mundhe: प्रिती झिंटाच्या टी - शर्टवर 'Team तुकाराम मुंढे', अभिनेत्री खरंच मुंढेंची फॅन? पापाराझींसमोर म्हणाली...
प्रिती झिंटाच्या टी - शर्टवर 'Team तुकाराम मुंढे', अभिनेत्री खरंच मुंढेंची फॅन? पापाराझींसमोर म्हणाली...
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?
Pune MPSC Students Protest : एमपीएससीवर रोष विद्यार्थ्यांचा आक्रोश! | Special Report ABP Majha
Manoj Jarange Andolan : लढाई आरक्षणाची चर्चा जरांगेंच्या भाषेची | Special Report ABP Majha
Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Hira Thakur : हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
Jalgaon Dahihandi Row : 51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
Non Veg In Durga Puja : आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
MPSC Paper Leak : एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
Embed widget