Chaos Erupts At Honey Singh Delhi Show: यो यो हनी सिंहचा (Honey Singh) 'माय चॅप्टर - इंडिया टूर' दिल्लीतून सुरू झालं. धमाकेदार अंदाजात सुरू झालेल्या या कॉन्सर्टला मात्र, संपता संपता गालबोट लागलं. इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर आयोजित या कॉन्सर्टनं तेव्हा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं, जेव्हा हा भव्य कॉन्सर्टमध्ये अचानक गोंधळ झाला. धमाकेदार कॉन्सर्टमध्ये अतानक हाणामारी सुरू झाली. एका बाजूला हजारो चाहते हनी सिंहच्या सुपरहिट गाण्यांवर थिरकत होते, तर स्टेडियमच्या दुसऱ्या बाजूला मात्र भयावह हिंसक गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. 14 मार्चच्या रात्री दिल्लीतील हनी सिंहच्या कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं सविस्तर जाणून घेऊयात... 

सुपरहिट परफॉर्मन्सवेळी झालेली हाणामारी

हनी सिंहनं मंचावर पाऊल ठेवताच, 'देसी कलाकार' आणि 'ब्लू आईज' सारखी त्याची सुपरहिट गाणी गायली आणि संपूर्ण स्टेडियम दणाणून सोडलं. दिल्लीतील चाहते आपल्या लाडक्या रॅपरला अगदी जवळून पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आतुर झाले होते. संपूर्ण जमाव जेव्हा 'ब्राउन रंग' आणि 'लुंगी डान्स' सारख्या गाण्यांवर थिरकत होता, तेव्हाच अचानक तिथलं वातावरण बिघडलं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंमध्ये हे स्पष्टपणे दिसून येतंय की, या म्युझिक कॉन्सर्टवेळी प्रेक्षकांमधील एका ग्रुपमध्ये आणि कार्यक्रमाच्या स्पॉन्सर टीमचा, एका मुद्द्यावरून शाब्दिक वाद झाला. अवघ्या काही मिनिटांतच, या शाब्दिक वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जोरदार हाणामारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि ते एकमेकांवर लाथा-बुक्क्यांचा वर्षाव करत आहेत. 

यापूर्वीही निर्माण झालेला वाद 

प्रसिद्ध रॅपर हनी सिंह पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आला आहे. गेल्या जानेवारीमध्ये दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका संगीत कार्यक्रमादरम्यान हनी सिंहनं भर मंचावरून काही अश्लील आणि आक्षेपार्ह वक्तव्य केलेली. ज्यामुळे सोशल मीडियावर टीकेची प्रचंड लाट उसळली. एका व्हायरल व्हिडीओमध्ये, दिल्लीतील कडाक्याच्या थंडीचा संदर्भ देत असताना हनी सिंह अत्यंत अश्लील भाषेचा वापर करताना दिसून आला. त्यानं लैंगिक जवळीकीबाबत आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या होत्या.

गायकानं मागितली माफी 

वाढता वाद आणि टीकेच्या पार्श्वभूमीवर, हनी सिंहनं याप्रकरणी जाहीरपणे माफी मागितली होती. तसेच, माफी मागताना म्हटलेलं की, "माझ्या भाषेमुळे अनेक लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या, ज्यासाठी मी माफी मागतो. कोणालाही दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मानवाकडून चुका होणं स्वाभाविक आहे..." तसेच, भविष्यात आपल्या शब्दांवर अधिक संयम राखण्याचा आणि विचारपूर्वक बोलण्याचा संकल्पही त्यानं केलेला.

महत्त्वाच्या इतर बातम्या: 

'त्या' कॉमेडी शोनंतर चॅनलच्या ऑफिसवर दगडफेक, प्रसिद्ध विनोदी अभिनेत्यानं थेटच सांगितलं; 'आता भीती वाटते'