तरुणीची बदनामी केल्याचा आरोप, सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर चंगळ्याच्या अडचणी वाढणार? पुण्यातील वकिलाने नोटीस पाठवली
Changlya Bole Kuhu : तरुणीची बदनामी केल्याचा आरोप, सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर चंगळ्याच्या अडचणी वाढणार? पुण्यातील वकिलाने नोटीस पाठवली

Changlya Bole Kuhu : इन्स्टाग्रामवर सध्या कोण कसा फेमस होईल काय सांगता येत नाही. असाच एक पुण्यातील तरुण 'चंगळ्या बोले कुह' या डायलॉगने फेमस झालाय. त्याला चंगळ्या नावानेच ओळखलं जाऊ लागलंय. मात्र, त्याचं खरं नाव आहे शुभम माळवे... आता त्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण पुण्यातील वकील Wajed Khan Bidkar यांनी त्याला नोटीस बजावली आहे. नेमकं प्रकरण काय समजून घेऊयात..
पुण्यातील वकिल Wajed Khan Bidkar यांनी शुभम माळवे याच्यावर एका तरुणीची बदनामी केल्याचा आरोप केला आहे. तरुणीने Wajed Khan यांना चंगळ्याला नोटीस बजावण्यास सांगितली आहे. शुभम माळवे आणि त्याच्या आईने प्रतिक्षा शिंदे या तरुणीची आणि तिच्या पतीची बदनामी केल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियावर शुभम माळवे आणि त्याची आई खोटे व्हिडीओ पोस्ट करत प्रसिद्धी मिळवत असल्याचं वकिलांनी म्हटलंय.
वकिल Wajed Khan Bidkar यांनी यापूर्वी स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याची केस देखील लढली होती. त्यानंतर ते चर्चेत आले होते. वाजेद खान यांची सोशल मीडियावर देखील मोठी फॉलोविंग आहे.
प्रतिक्षा शिंदे या तरुणीचे वकिल वाजीद खान म्हणाले, प्रतिक्षा शिंदे आणि शुभम माळवे यांची ओळख या पूर्वीपासून आहे. पण शुभम माळवेने जाणून बुजून तिच्याबाबत आणि तिच्या पतीबाबत अपमानास्पद व्हिडिओ बनवला. त्यामुळे त्या दोघांनाही मानसिक त्रास झालाय. दरम्यान, आता शुभम माळवे आणि त्याच्या आईला 7 दिवसांच्या आत उत्तर द्यावे लागणार आहे.
चंगळ्या बोलो कुहू या डॉयलॉगने इन्स्टाग्रामवर फेमस झालेल्या तरुणाचे नाव शुभम माळवे असं असून तो इंदापुरातील डिकसळ या गावचा राहिवासी आहे. आता चंगळ्या आणि आई दोघांनाही वकिलाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. शुभम माळवेची इन्स्टाग्रामवर मोठी फॅन फॉलोविंग असून त्याच्या या डायलॉगवर गाणं देखील आलं आहे. दरम्यान, वकिलांनी नोटीस पाठवल्यानंतर आता शुभम माळवे काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
गोविंदासोबत 'लाल दुपट्टेवाली' गाण्यावर थिरकणारी अभिनेत्री आता कशी दिसते? 32 वर्षानंतरही सौंदर्य कायम





















