Nilesh Sable On Upcoming Marathi Movie:महाराष्ट्रातल्या (Maharashtra) प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कार्यक्रम म्हणजे, 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya). तब्बल 10 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर 2024 मध्ये या कार्यक्रमानं निरोप घेतला. त्यानंतर या मराठमोळ्या कार्यक्रमाचं (Marathi Show) नवं पर्व, 26 जुलैपासून झी मराठीवर (Zee Marathi) सुरू झालं पण, नव्या बदलांसह... 'चला हवा येऊ द्या'ची संपूर्ण टीम या नव्या पर्वात दिसली नाही. महत्त्वाची बाब म्हणजे, निलेश साबळे (Nilesh Sable) आणि भाऊ कदम (Bhau Kadam) ही प्रेक्षकांची दोन लाडकी व्यक्तीमत्त्व नव्या पर्वात नव्हती. व्या पर्वाची घोषणा होताच, हे दोघे का नाहीत? यावरुन बराच गदारोळ झालेला. त्यावेळी आम्ही वेगळ्या कामांमध्ये बिझी आहोत, असं उत्तम दोघांकडूनही देण्यात आलेलं. तेव्हापासूनच चाहत्यांना उत्सुकता होती की, दोघे काय वेगळं घेऊन येणार. त्यानंतर भाऊ कदम सिनेमा आणि वेब सीरिजमध्ये झळकले. पण, निलेश साबळे मात्र काही शो वगळले, तर कुठे दिसले नव्हते. अशातच आता, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आगामी सिनेमाबाबत माहिती दिलीय. 

Continues below advertisement

'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळे यांनी नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सबाबत सांगितलं. खरं तर, 'चला हवा येऊ द्या'चं पहिलं पर्व यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या पर्वात मात्र, निलेश साबळे दिसले नव्हते. त्यामुळे प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली की, आता निलेश साबळे काय करणार? अशातच याचच उत्तर निलेश साबळेंनी मुलाखतीत बोलताना दिलं आहे. 

निलेश साबळे नेमकं काय म्हणाले? (Nilesh Sable On Upcoming Marathi Movie Starcast)

Continues below advertisement

निलेश साबळे म्हणाले की, "साधारण 80 टक्के सिनेमा पूर्ण झाला आहे. पण आता खूप पाऊस असल्यामुळे शुटिंग थांबलंय. पण, हा सिनेमा करणं चॅलेंजिंग आहे. कारण, प्रेक्षकांना थिएटर पर्यंत आणायचंय. सिनेमाचा टीझर किंवा ट्रेलर बघून ठरतं सिनेमा बघायला जायचं की नाही. त्यामुळे ते खूप मोठं चॅलेंज आहे. पण, हा प्रयोग फसणार नाही ह्याची मला खात्री आहे. कारण, मी घाई करत नाहीये. प्रेक्षकांना आवडेल अशी माझी अपेक्षा आहे..."

"मराठी इंडस्ट्रीतले दिग्गज कलाकार या सिनेमात आहेत. त्यामुळे त्यांचा अनुभव ही या सिनेमासाठी मोठी शिदोरी आहे. विषयही वेगळा आणि मोठा आहे. मराठी इंडस्ट्रीतले 37 कलाकार या सिनेमात आहेत, संख्या वाढूही शकते. कथा महत्त्वाची, कथाच नसेल कागदावर तर स्क्रिनवर काय होल्ड होणार? 'चला हवा येऊ द्या' ही वेगळीच पठडी आहे आणि सिनेमा ही वेगळी पठडी आहे. कारण 'चला हवा येऊ द्या' सिनेमात दिसायला लागलं, तर लोक म्हणतील 'चला हवा येऊ द्या'च बरंय... 'चला हवा येऊ द्या'च पाहायचं असेल, तर तो सिनेमा आम्ही का पाहायचा?  त्यामुळे 'चला हवा येऊ द्या', तुम्हाला सिनेमात नाही दिसणार एवढं मात्र नक्की...", असंही निलेश साबळे यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bhau Kadam On Shooting And Fmaily Time: भाऊ कदम काम नसताना काय करतात? 'त्या' प्रश्नावर म्हणाले, 'घरी बसल्यावर अनेक विचार...'