Cannes Film Festival 2026 Nivedita Saraf Look: संपूर्ण जगाच्या नजरा खिळलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या (Cannes Film Festival) रेड कार्पेटवर यंदा मराठी सेलिब्रिटींनी आपली उपस्थिती लावून मराठी रसिकप्रेक्षकांची मान अभिमानानं उंचावली. मराठीतले दिग्गज अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री (Marathi Actress) निवेदिता सराफ (Nivedita Saraf), अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर यांनी कान्सच्या रेड कार्पेटवर आपला डेब्यू केला. यावेळी मराठी सेलिब्रिटींच्या आऊटफिट्सवर परदेशी कलाकारांच्याही नजरा खिळल्या. ज्या कान्सच्या रेड कार्पेटवर बोल्ड आणि ग्लॅमरस ड्रेसेसचा भरणा असतो, त्या रेड कार्पेटवर मराठी सेलिब्रिटींनी आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचा ठसका दाखवून दिला.
निवेदिता सराफ यांनी यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes Film Festival 2026) उपस्थिती लावत मराठी मनोरंजनसृष्टीचा गौरव वाढवला आहे. पती आणि मराठीतले ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या हातात हात घालून निवेदिता सराफ कान्सच्या रेड कार्पेटवर मिरवल्या. आपला साधेपणा, देखणं व्यक्तिमत्त्व आणि अभिजात शैलीमुळे ओळखल्या जाणाऱ्या निवेदिता सराफ यांच्या कान्समधील उपस्थितीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेल. रेड कार्पेटवरील त्यांचा एलिगंट लूक चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला. निवेदिता सराफ यांच्या संपूर्ण मराठमोळ्या लूकमध्ये सर्वांच्या नजरा त्यांच्या ब्लाऊजवर असलेल्या एका चित्रावर खिळलेल्या. त्या चित्रानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं.
निवेदिता सराफ यांच्या ब्लाऊजवर रेखाटलेल्या चित्रात काय खास?
मराठमोळ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी मराठी नावाची पाटी (Marathi Name Plate) घेतलेलं चित्र घेऊन फ्रान्समधील (France) कान्स चित्रपट महोत्सवात रेड कार्पेटवर ग्रँड एंट्री घेतली. यावेळी निवेदिता सराफ यांच्या साडीवर असणारे पोलके आणि नऊवारी नेसून मराठी पाटी घेतलेल्या मुलींचं चित्र पंढरपुरातील (Pandharpur News) चित्रकार सौरभ डिंगरे यांनी रेखाटलेलं आहे.
सध्या सोशल मीडियावर केवळ निवेदिता अशोक सराफ यांच्या कान्स चित्रपट महोत्सवातील साडीची आणि संपूर्ण फॅशन स्टाईलची चर्चा रंगली आहे. यामध्ये निवेदिता सराफ यांच्या साडीवर अर्थात ब्लाऊजच्या मागे असणारे तीन मराठमोळ्या पोलके , नऊवारी आणि नाकात नथ घातलेल्या मुलींच्या हातात असणाऱ्या मराठी नावाच्या पाठीचं चित्र आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका वाजवून गेलं. यानिमित्तानं मराठी चित्राची आणि निवेदिता सराफ यांच्या फॅशन स्टाईलची मोठी चर्चा सुरू झाली. याचवेळी हे चित्र पंढरपुरातील चित्रकार सौरभ सदानंद डिंगरे यांनी रेखाटल्याची माहिती समोर आली आहे.
मराठी अस्मिता आणि मराठी संस्कृतीचं प्रतीक असणारं चित्र
सौरभ डिंगरे हे मदालसा बाय सौरभ या नावानं आपली चित्रं प्रसिद्ध करत असतात. सौरभ डिंगरे यांनी रेखाटलेल्या चित्रांचं आजवर पुणे , मुंबई , बंगळुरू , गोवा आणि कलकत्ता अशा अनेक ठिकाणी प्रदर्शन भरवलं गेलेलं. स्वतःच्या आगळ्यावेगळ्या आणि भारतीय संस्कृतीच्या परंपरेची जपणूक करत स्वतःची अशी वेगळी स्टाईल सौरभ डिंगरे यांनी आपल्या चित्रात निर्माण केली आहे. मराठी अस्मिता आणि मराठी संस्कृतीचे प्रतीक असणारे चित्र त्यांनी निवेदिता सराफ यांच्या डिझायनर साडीसाठी दिले होते. आणि हेच चित्र फ्रान्समधील कान्स महोत्सवात चांगलं चर्चेत आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
