Cannes Film Festival: जगातील अत्यंत प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी समजल्या जाणाऱ्या कान्स चित्रपट महोत्सवाची सध्या मनोरंजनसृष्टीत एकच चर्चा आहे. 12 मे ते 23 मे या कालावधीत आयोजित करण्यात आलेला हा चित्रपट महोत्सव दरवर्षी फ्रेंच रिविएरा येथे होतो. या चित्रपट महोत्सवात कोणत्या चित्रपटांचा समावेश होणार याकडे जगभरातील चित्रपटप्रेमी व निर्मात्यांचे लक्ष असते. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय चित्रपटांनीही या महोत्सवात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. 'ऑल दॅट ब्रीथ्स ' 'ऑल वी इमॅजिन ॲज लाईट ' ' होमबाऊंड ' यांसारख्या चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले गेले. यावर्षी म्हणजेच 2026 च्या कान्स चित्रपट महोत्सवात भारतीय 6 चित्रपट दाखवले जाणार आहेत.
1. अम्मा अरियान
मल्याळम सिनेमाची ही क्लासिक फिल्म ' अम्मा अरियान ' या चित्रपटाला कान्स चित्रपट महोत्सवातील ' कान्स क्लासिक्स ' सेक्शन मध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. 1986 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट जॉन अब्राहमचा मास्टरपीस मानला जातो. या चित्रपटाची कथा पुरुषन नावाच्या एका तरुण कार्यकर्त्याभोवती फिरते. हा त्याच्या साथीदारांसह एका आईला तिचा मुलगा हरीच्या मृत्यूची बातमी देण्यासाठी निघालाय. हा प्रवास हळूहळू दुःख, राजकीय प्रतिकार, युवा चळवळ आणि वैचारिक संकटांची खोली दाखवणारा ठरतो.
2. बालन : द बॉय
फिल्ममेकर चिदंबरम यांचा बालन द बॉय हा मल्याळी चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवाच्या ' मार्चे डू फिल्म ' या विभागात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाची कथा त्याग भावनिक अस्थिरता आणि कठीण सामाजिक परिस्थितीत आपली ओळख शोधणाऱ्या बालन या मुलाभोवती फिरते. मायलेकाच्या नात्यातील गुंतागुंतीचे चित्र आणि या चित्रपटात करण्यात आलं आहे. हा चित्रपट एकटेपणा संघर्ष आणि आत्मविश्वास अशा भावनांना स्पर्श करणारा आहे.
3. चारडिकला
पंजाबी सिनेमाला जागतिक स्तरावर नेणाऱ्या दिग्दर्शक अमरजीत सिंग सर्व यांच्या 'चारडिकला ' या चित्रपटाचा प्रीमियर यावर्षी कान्स चित्रपट महोत्सवा आता दाखवला जाणार आहे. या चित्रपटात एमी विर्क आणि रुपी गिल प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा एका समर्पित नर्सची कथा आहे. या नर्सच्या शांत आयुष्यात अनेक उलथापालथी घडतात. एका खोट्या केस मध्ये तिला गोवलं जातं.नंतर आलेल्या एकटेपणाचा सामना करण्यासाठी ती दुसऱ्यांची मदत करते. संघर्ष करणाऱ्या कुटुंबांचा सहारा बनते. हा चित्रपट 29 मे ला चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.
4.सितंबर 21
दिग्दर्शक करेन क्षिती सुवर्णा यांची पहिली फिचर फिल्म 'सितंबर 21 ' या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर 16 मे रोजी कान्सच्या पॅलेस थिएटरमध्ये होणार आहे. हिंदी आणि कन्नड भाषेमध्ये बनलेल्या या चित्रपटात एका वृद्ध अल्झायमर झालेल्या रुग्णाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. या रुग्णाची पत्नी कोविड महामारीत शेजारच्या घरात क्वारंटाईन झाली आहे. जशी जशी त्याची स्मृती कमी होत जाते तसा त्याचा दुरावलेला मुलगा घरी परत होतो.वडिलांची काळजी आणि त्यात संतुलन साधनाचा प्रयत्न करतो. अत्यंत भावनिक जबाबदारीच्या ओझ्याखाली दबलेल्या कुटुंबाची काळजी घेतानाच्या गुंतागुंतीवर बनलेला चित्रपट आहे.
5.'शॅडोज ऑफ मुनलेस नाईट '
एफटीआयच्या विद्यार्थिनी मेहेर मल्होत्राच्या शाडोज ऑफ द मून लेस नाईट 24 मिनिटांच्या पंजाबी लघुपटाची कान्सच्या 'ला सिनेफ ' विभागासाठी निवड करण्यात आली आहे.या चित्रपटात रंजन नावाच्या कारखान्यातील कामगाराची कथा दाखवण्यात आली आहे.हरणजन रात्रपाळीत काम करताना आर्थिक ताण ,झोपेच्या अभावाने मानसिक तणावाशी झुंज देत असतो. खचाखच भरलेले घर आणि घरची परिस्थिती या सगळ्यात त्याची मानसिक स्थिती हळूहळू ढासळू लागते.
6.'सिस्टर ऑफ द वर्ल्ड फ्लॉवर '
लंडन स्थित दिग्दर्शक श्रोमेही चक्रवर्ती यांचा 'सिस्टर ऑफ द वर्ल्ड फ्लॉवर हा माहितीपट कान्सच्या 'मार्च डू फिल्म' मध्ये दाखवला जाणार आहे. हा चित्रपट भारतातील पहिली कायदेशीर महूआ डिस्टिलरी चालवणाऱ्या दोन बहिणींची कथा आहे. मोठी बहीण स्थानिक पेयाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्याचं स्वप्न पाहत असते.तर धाकटा बहिणीला तिची लैंगिक ओळख स्वीकारताना एक पुरुष म्हणून जीवन जगण्याची इच्छा आहे. हा माहितीपट लैंगिक ओळख महत्त्वकांक्षा आणि स्वतःला स्वीकारणे या विषयाला अगदी संवेदनशीलपणे हाताळतो.
