Cannes 2026 Ashok Saraf Nivedita Saraf Red Carpet Look: सिनेसृष्टीतील (Film Industry) सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes Film Festival) सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरतोय. या आंतरराष्ट्रीय सोहळ्यात केवळ उत्कृष्ट सिनेमांचाच गौरव होत नाही, तर फिल्म फेस्टिव्हलसाठी (Cannes Film Festival 2026) उपस्थित राहणाऱ्यांचे ग्लॅमरस लूक आणि रेड कार्पेटवरील (Cannes Red Carpet) उपस्थितीही तितकीच चर्चेत असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही जगभरातील सेलिब्रिटींनी कान्समध्ये आपल्या स्टाईल आणि व्यक्तिमत्त्वाची खास छाप पाडली. कान्समध्ये हॉलिवूड (Hollywood News) आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचे (Bollywood Celebrity) लूक नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. पण, यंदाचा कान्स मराठी रसिकप्रेक्षकांसाठी अत्यंत खास ठरला आहे. त्यासोबतच यंदाचा कान्स फिल्म फेस्टिव्हल मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाराही ठरला आहे.
यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमघ्ये अशोक सराफ (Ashok Saraf) आणि निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांनी पारंपरिक मराठमोळ्या वेशात (Marathi Look) रेड कार्पेटवर वावरत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. त्यांच्या साध्या पण आकर्षक लूकची सोशल मीडियावर विशेष चर्चा रंगली आहे. तर प्राजक्ता माळी (Prajakta Mali) आणि अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) हिनंही पारंपरिक मराठी पेहरावात फ्रान्समध्ये मराठी संस्कृतीची झलक दाखवत चाहत्यांची मनं जिंकली.
यंदा फ्रान्समध्ये सुरू असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी हजेरी लावली. मराठी सिनेसृष्टीचे लाडके अशोकमामा यांनी निवेदिता सराफ यांचा हात हातात धरत दिमाखात रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची कान्सच्या रेड कार्पेटवर एन्ट्री होताच, उपस्थितांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. त्यासाठी कारण ठरला अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी केलेला मराठमोळा साज. रेड कार्पेटवर अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी मराठी संस्कृती जपत पारंपरिक लूक केल्याचं दिसलं. अशोक-निवेदिता सराफ यांनी मराठमोळ्या लूकनं कान्समध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
कान्समध्ये अशोक सराफ, निवेदिता सराफ यांचा मराठमोळा लूक (Ashok Saraf, Nivedita Saraf Marathi Look)
कान्ससाठी अशोक सराफ-निवेदिता सराफ यांनी मराठमोळा लूक केला होता. पांढऱ्या रंगाचा सूट आणि काळ्या रंगाची पँट असा लूक अशोक सराफ यांनी केला होता. तर निवेदिता सराफ महाराष्ट्राचं महावस्त्र असलेल्या पैठणी साडीत दिसल्या. त्यासोबतच केसांत गजरा माळून दागिन्यांचा साज करत कान्सच्या रेड कार्पेटवर त्या अवतरल्या. त्यांना पाहताच क्षणी सगळेच आश्चर्यचकित झाले. रेड कार्पेटवर येताच अशोकमामांनी हात जोडत सगळ्यांना नमस्कार केला. त्यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
एका युजरनं कमेंट करत म्हटलंय की, महाराष्ट्राच्या मातीतला मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला, तर त्याचे संस्कार तो विसरत नाही.
यंदा कान्समध्ये माय मराठीचा डंका
काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेता पुष्कर जोग यानं कान्समधील त्याचा स्टायलिश लूक आणि उपस्थितीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर आता ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री निवेदिता सराफ, प्राजक्ता माळी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता वालावलकर यांनीही कान्समध्ये आपली उपस्थिती दर्शवली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
