BTS Band: कोरियन पॉप म्यूझिक अर्थात के पॉप, के ड्रामा आणि एकूणच कोरियन संस्कृतीने जगभरातील तरुणाईवर गारूड निर्माण केलंय. याच कोरियन कल्चरमधला सर्वात लोकप्रिय घटक म्हणजे बीटीएस हा कोरियन बँड. के पॉपच्या जगात धुमाकुळ घातलणारया या प्रसिध्द बँडकडून फॅन्ससाठी खूशखबर आहे. या बातमीनं जगभरातले BTS चे चाहते प्रचंड उत्साहित झाले आहेत. ग्रूप सदस्य किम नामजून म्हणजेच RM आणि V किम तायहयुंग आणि सुगा लवकरच त्यांची अनिवार्य लष्करी सेवा पूर्ण करून परत येत आहेत. दक्षिण कोरियात 18ते 35 वयोगटातील सर्व पुरुषांसाठी लष्करात काम करणं अनिवार्य आहे. बीटीएसच्या बाकी सर्व सदस्यांची ही सेवा पूर्ण झालीय. आता त्यांच्या परतीची वेळ जवळ आली आहे. त्यामुळे बीटीएस चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सोशल मीडियावर तर बीटीएसच्या पुरनागमनाच्या पोस्ट तुफान व्हायरल होत आहेत.चाहत्यांच्या उत्साहाला पारावार उरला नाहीय. (BTS)

Continues below advertisement

कोणते सदस्य कधी परत येणार?

बीटीएसच्या सर्व सात सदस्यांनी 2013मध्ये या बँडमध्ये पदार्पण केलं होतं. आता त्यांनी त्यांच्या देशात सेवा पूर्ण करण्याचा निर्णय घेतलाय.जिन डिसेंबर 2022मध्ये सैन्यात सामील झाला आणि 12जून 2024रोजी परतला.

जे होप एप्रिल 2023मध्ये आला आणि ऑक्टोबर 2024मध्ये परतला. 

Continues below advertisement

खांदयाच्या दुखापतीमुळे सुगा सार्वजनिक सेवेतून सुट्टी घेत आहे आणि 21जून 2025 रोजी परत येईल.

आरएम आणि व्ही यांनी 11 डिसेंबर 2023 रोजी सेवा सुरू केली आणि 10 जून 2025 रोजी परत येतील.

जिमिन आणि जंगकूक यांची 12 डिसेंबर 2023 रोजी भरती झाली आणि ते 11 जून 2025 रोजी चाहत्यांकडे परत येतील.

बीटीएसचा संगीतमय प्रवास

2023  मध्ये ‘2 Cool 4 Skool’ या गाण्याने बीटीएसने पदार्पण केले. त्यानंतर 'डार्क अँड वाइल्ड', 'विंग्ज', 'लव्ह योरसेल्फ' मालिका आणि ‘Dynamite’, ‘Butter’, ‘Permission to Dance’ ‘My Universe’ सारख्या गाण्यांनी बिलबोर्ड चार्टवर सातत्याने वर्चस्व गाजवले.

2022 मध्ये या ग्रूपने ॲक्टिव्हिटीपासून ब्रेक घेतला होता.यातील सर्व कलाकार स्वतंत्र प्रोजेक्टवर काम करत होते. आता बीटीएसमधले सगळेजण आपापली लष्करी सेवा पूर्ण करून परत येत आहेत. त्यामुळे बीटीएस लवकरच स्टेजवर धमाकेदार पुनरागमन करेल अशी चाहत्यांना आशा आहे.

हेही वाचा

Sharad Talwalkar Grandson Kapil Talwalkar In Hollywood: हॉलिवूड गाजवतोय दिवंगत मराठी अभिनेत्याचा नातू, वडील प्रसिद्ध क्रिकेटर, नुकताच झळकलाय 'या' प्रसिद्ध वेब सीरिजमध्ये...