Britney Spears California case: हॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जगप्रसिद्ध अमेरिकन पॉप सिंगर ब्रिटनी स्पीयर्स चर्चेत आली आहे. चर्चेत येण्यामागचं कारण तिला अटक झाली आहे. कॅलिफोर्नियामध्ये पोलिसांनी तिला अटक केली होती. नंतर पोलिसांच्या ताब्यातून तिला सोडण्यात आले. दरम्यान, हे प्रकरण अद्याप संपलेलं नाही. तिला न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गायिकेवर दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा गंभीर आरोप आहे. या घटनेचा अधिक तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे.
ही घटना 4 मार्च (बुधवारी) घडली असल्याची माहिती आहे. ती कॅलिफॉर्नियातील वेंचुरा काउंटी येथे कार चालवत होती. गायिका दारुच्या नशेत गाडी चालवत होती, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. संशय आल्यामुळे पोलिसांनी तिच्या वाहनाला थांबवले, तसेच तिला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनी स्पीयर्सला पोलीस कार्यालयात नेण्यात आले. जिथे तिची कसून चौकशी करण्यात आली. कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तिला सोडण्यात आले. दरम्यान, तिची कार जप्त करण्यात आली आहे.
गायिकाला सोडण्यात आले असले तरी, तिला या प्रकरणाबाबत न्यायालयात हजर राहावं लागेल. 4 मे रोजी या प्रकरणाबाबत न्यायालयीन सुनावणी होणार आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर ब्रिटनी स्पीयर्सचे इन्स्टाग्राम अकाऊंटही दिसत नाहीये. तिने इन्स्टाग्राम अकाऊंट डिलिट केले असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, तिचे अकाऊंट डिलिट झाले आहे, की करण्यात आले आहे? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
अमेरिकन पॉप सिंगर ब्रिटनी स्पीयर्सचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिचे गाणे आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. तिनं आपल्या गायनातून चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. ती सोशल मीडियावरही सक्रीय असते. 42 मिलियन नेटकरी तिला फॉलो करतात. ती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटमध्ये फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. ती चाहत्यांशी कनेक्टेड असते. दरम्यान, तिला अटक केल्यानंतर चाहत्यांमध्ये खळबळ उडाली. तिला अटक होते की, या प्रकरणातून तिची सुटका होते, याची माहिती लवकरच समोर येईल. दरम्यान, या घटनेनंतर मनोरंजनसृष्टीत खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
