Bramayugam National Award Film: मल्याळम सिनेसृष्टीनं (Malayalam Film Industry) पुन्हा एकदा हे सिद्ध केलंय की, सिनेमाचं बजेट आणि ग्लॅमरपेक्षा त्याची कथा आणि कलाकारांनी साकारलेल्या भूमिका अधिक महत्त्वाच्या असतात. दिग्दर्शक राहुल सदाशिवन यांचा 'ब्रह्मयुगम' (Bramayugam) सिनेमा खऱ्या अर्थानं एक 'परिपूर्ण चित्रपट' (Complete Cinema) म्हणून ओळखला जाऊ शकतो. केवळ 25 कोटी रुपयांच्या माफक बजेटमध्ये आणि केवळ तीन मुख्य पात्रांसह पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपात चित्रित झालेला हा हॉरर सिनेमा (Horror Movie) जगभरात 87 कोटी रुपयांची कमाई करून गेला आहे. याच सिनेमासाठी मुख्य अभिनेते मामूटी यांना 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेलं. 

Continues below advertisement

'ब्रह्मयुगम'ची कथा केवळ तीन पात्रांभोवती फिरते (Bramayugam Story Line)

'ब्रह्मयुगम' सिनेमाची पार्श्वभूमी 17व्या शतकातील केरळमधल्या एका गावातली आहे. याची कथा 'थेवन' (अर्जुन अशोकन) नावाच्या लोकगायकाभोवती फिरते, जो घनदाट जंगलाच्या आत वसलेल्या एका प्राचीन वाड्यात पोहोचतो. तिथे त्याची भेट एका रहस्यमय आचाऱ्याशी (सिद्धार्थ भरतन) आणि त्या वाड्याच्या मालकाशी, म्हणजेच 'कोडुमोन पोटी' (ममूटी) यांच्याशी होते. या तीन पात्रांभोवती गुंफलेली ही कथा सत्ता, जातिव्यवस्था, भीती आणि वेडेपणा यांसारख्या विषयांचा सखोल वेध घेते. उपकथानके किंवा अनावश्यक पात्रांचा अभाव असलेला हा सिनेमा पूर्णपणे एकाच ठिकाणी (लोकेशनवर) चित्रित करण्यात आला आहे.

Continues below advertisement

'ब्लॅक अँड व्हाईट'चा मायावी संसार... 

ब्लॅक अँड व्हाईट फॉर्मेट 'ब्रह्मयुगम'ची सर्वात मोठी खासियत आहे. राहुल सदाशिवननं जाणूनबुझून रंग हटवून फिल्मला जुन्या काळातला बाज दिला. कॅमेरा मूव्हमेंट प्रेक्षकांसाठी 17व्या शतकातील अंधाऱ्या जगात घेऊन जाते. म्युझिक आणि प्रोडक्शन डिझाइनसुद्धा सिनेमाला आणखी गंभीर आणि भयावह बनवते. फिल्मला 'सायकोलॉजिकल हॉरर' आणि 'फोक हॉरर' दोन्ही कॅटेगरीमध्ये प्रशंसा मिळाली आहे.

'ब्रह्मयुगम'साठी मामूटीला नॅशनल अवॉर्ड 

'ब्रह्मयुगम'नं 72 व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारांमध्ये दोन महत्त्वाचे पुरस्कार जिंकले आहेत. तर शहनद जलाल यांना 'सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी'साठी पुरस्कार मिळाला. या सिनेमाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे, 74 वर्षीय ममूटी यांचा अभिनय, 'कोडुमोन पोत्ती'च्या भूमिकेत ते इतके भीतीदायक, रहस्यमय आणि प्रभावी वाटलं की, त्यांनी प्रेक्षकांच्या मनात धडकी भरवली. त्यांचे हावभाव, बोलण्याची शैली आणि देहबोली यांवरच संपूर्ण सिनेमा आधारलेला होता. मामूटी यांचा हा चौथा राष्ट्रीय पुरस्कार आहे.

'ब्रह्मयुगम': बजेट आणि बॉक्स ऑफिस कमाई

बजेट आणि कमाईचा विचार करता, हा सिनेमा 25 ते 27 कोटी रुपयांच्या माफक बजेटमध्ये तयार करण्यात आलेला. मल्याळम भाषेतील मूळ प्रदर्शनानंतर, याचं हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड डब केलेल्या आवृत्त्याही प्रदर्शित करण्यात आल्या. या सिनेमानं देशांतर्गत आणि परदेशातील अशा दोन्ही बाजारपेठांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. 87 कोटी रुपयांची जागतिक कमाई हे सिद्ध करते की, जेव्हा प्रबळ पटकथा आणि दमदार अभिनयाची जोड मिळते, तेव्हा केलेले प्रयोग नक्कीच यशस्वी होऊ शकतात.

ओटीटीवर कुठे पाहायला मिळेल 'ब्रह्मयुगम'?

'ब्रह्मयुगम' मल्याळम सिनेमाच्या नव्या युगाचं प्रतीक बनली आहे. समिक्षकांनी या फिल्मला 'मास्टरक्लास इन सिनेमॅटिक टेंशन', असं म्हटलं आहे. जर तुम्ही अजूनही ही फिल्म पाहिली नसेल, तर तुम्हाला सोनी लिव्ह ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही फिल्म पाहता येईल. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

OTT Mystery Thriller Series IMDb 8 Rating: वर्तमानपत्राचा छोटासा तुकडा, त्यात दडलेलं भयानक रहस्य; 8 IMDb रेटिंगची 'ही' काळजाला पिळ घालणारी मिस्ट्री थ्रिलर सीरिज, पाहिलीत?