Upcoming Movie Next Week: 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर रिलीज होणाऱ्या चित्रपटांना अनेकदा लाँग वीकेंड आणि सणाच्या सुट्टीचा मोठा फायदा मिळतो. त्यामुळे येत्या काळात बॉक्स ऑफिसवर(Box Office Collection) काही दमदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सरकारी सुट्टी आणि त्यानंतर येणारा वीकेंड यामुळे या चित्रपटांना चांगली ओपनिंग मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत 15 ऑगस्टच्या आसपास रिलीज झालेल्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मोठा फायदा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात रिलीज होणारे हे चार चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करू शकतात. 14 ऑगस्टला रिलीज होणाऱ्या चित्रपटांची यादी पाहा...

Continues below advertisement

बटवारा 1947

आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसअंतर्गत तयार झालेला ‘बटवारा 1947’ हा या आठवड्यातील मोठ्या चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. या चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिकेत आहेत. फाळणीनंतर भारतातून पाकिस्तानात जाण्याची वेळ आलेल्या एका मुस्लिम व्यक्तीची कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. शबाना आझमी एका हिंदू पाकिस्तानी महिलेची भूमिका साकारत आहेत. प्रीती झिंटा, करण देओल आणि अली फजल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या शुक्रवार, म्हणजेच 14 ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.सनी देओलसाठी 15 ऑगस्टचा काळ नेहमीच खास ठरला आहे. त्यांच्या ‘गदर 2’ या चित्रपटानेही याच मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका केला होता.

Continues below advertisement

आवारापन 2

इमरान हाश्मीचा ‘आवारापन 2’ सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला बॉक्स ऑफिसवर टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. इमरान हाश्मी पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या अवतारातील त्यांना पुन्हा पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. हा चित्रपट देखील 14 ऑगस्टला रिलीज होणार आहे.इमरान हाश्मी आणि सनी देओल यांच्यात बॉक्स ऑफिसवर होणारी टक्कर काही पहिल्यांदाच नाही. याआधी ‘अपने’ आणि ‘आवारापन’ या चित्रपटांच्या रिलीजवेळीही दोन्ही कलाकारांचे चित्रपट आमनेसामने आले होते. या क्लॅशमध्ये सनी देओलचा चित्रपट वरचढ ठरला होता.

द एंड ऑफ ओक स्ट्रीट

14 ऑगस्टला अमेरिकन सायन्स फिक्शन चित्रपट ‘द एंड ऑफ ओक स्ट्रीट’ देखील रिलीज होणार आहे. या चित्रपटात अॅन हॅथवे, इवान मॅकग्रेगर, मेसी स्टेला आणि क्रिश्चियन कॉनवेरी यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. या चित्रपटाचीही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

विश्वनाथ अँड सन्स

14 ऑगस्टला तमिळ-तेलुगू ड्रामा चित्रपट ‘विश्वनाथ अँड सन्स’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 40 वर्षीय ऑलिम्पिक स्तरावरील नेमबाजाच्या आयुष्याभोवती या चित्रपटाची कथा फिरते. नातेसंबंधांमध्ये अडकलेल्या या व्यक्तीचा भावनिक प्रवास चित्रपटातून दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात सूर्या मुख्य भूमिकेत आहेत.